कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे
करोना प्रतिबंधक लस प्रत्येक नागरिकांनी घ्यावी यासाठी आता वाडी-वस्तीवर प्रतिबंधक लस आरोग्य विभागाचे कर्मचारी घेऊन जात आहेत, याचाच कर्जत तालुक्यातील तोडकर वाडी याठिकाणी शुभारंभ करण्यात आला.
यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक खेडकर, कर्जत तालुका दूध संघाचे चेअरमन शंकर देशमुख, दादासाहेब सोनमाळी, सुनील काळे, भाजपचे तालुका उपाध्यक्ष पांडुरंग भंडारे सरपंच रूपाली दीपक धुमाळ, उपसरपंच सुखदेव पितळे, दत्तात्रय धुमाळ ,रोहिदास तोडकर, गणेश तोडकर, विशाल मोरे, नाना काळे, सुरेश धुमाळ, ईश्वर तोडकर ,कल्याण भोंडवे, ग्रामसेविका श्रीमती तापकीर मुख्याध्यापक दत्तात्रय गदादे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अशोक खेडकर यांनी सांगितले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महामार्गापासून प्रत्येक भारतीयाची संरक्षण व्हावे यासाठी मोफत प्रतिबंधक लस पुरवली आहे आपल्या व कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने प्रतिबंधक लस घ्यावी व कोरोणावर मात करावी.
यावेळी बोलताना शंकर देशमुख म्हणाले की अजूनही कोरोना चा धोका संपलेला नाही नागरिकांनी सर्व नियमांचे पालन करावे व प्रत्येकाने प्रतिबंधक लस घ्यावी.