कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे
कर्जत तालुक्यातील सितपुर येथील डॉक्टर ऋषिकेश जगताप यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पशुधन विकास अधिकारी वर्ग अ श्रेणीमध्ये उत्तीर्ण होत इतर मागासवर्गीय विद्यार्थी प्रवर्गामध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
नोव्हेंबर २०१९ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पशुधन विकास अधिकारी वर्ग – अ या पदासाठी लेखी परीक्षा घेतली होती.परंतु कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे आयोगाच्या अनेक परीक्षांचे निकाल रखडले होते.
ऑगस्ट २०२१ मध्ये लेखी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि सप्टेंबर मध्ये मुलाखती पार पडल्या.दिनांक ८ आॅक्टोबरला अंतिम निकाल जाहिर झाला.यात डाॅ.ऋषीकेश याची पशुधन विकास अधिकारी वर्ग – अ या पदासाठी निवड झाली.ॠषीकेश इतर मागास वर्गीयांमध्ये महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.
त्याच्या या कामगिरीमुळे कर्जत तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणखी एक इतिहास नोंदवला गेला आहे. मागील काही वर्षांपासून कर्जत तालुक्यातील अनेक विद्यार्थी लोक महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्य लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोग यासह इतर सर्व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये नेत्रदीपक यश मिळवत आहेत.
डाॅ.ऋषीकेश याचे शालेय शिक्षण कर्जत येथील तुम्ही यशवंत शिक्षण संस्थेत झाले,तर पशुवैद्यकिय पदवी शिरवळ जि.साताराच्या क्रांतिसींह नाना पाटील पशुवैद्यकिय महाविद्यालयात झाले.त्याने पशुवैद्यकिय पदवीत्तर पदवी देशातील अग्रगण्य संस्था भारतीय पशुचिकित्सा अनुसंसाधन संस्था इज्जतनगर बरेली ( IVRI ) उत्तर प्रदेश येथे घेतले.
श्री विठ्ठल विद्यालय माहीजळगांव चे पर्यवेक्षक आणि अहमदनगर जिल्हा विज्ञान अद्यापक संघाचे कार्यकारिणी सदस्य गजेंद्र जगताप यांचा तो मुलगा तर श्री हरेश्वर विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य ह.भ.प.अशोक महाराज बोंगाणे यांचा भाचा आहे.
त्याच्या या यशाबद्दल यशवंत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.किरण पाटिल,उपाध्यक्ष माणिकराव अनभुले, संस्थापक सचिव लक्षमणराव लांगोरे,मानद सचिव र.ल.तथा नंदकुमार लांगोरे,खजिनदार रवि पाटील,अशोक बोंगाणे तसेच प्राचार्या कमल तोरडमल,प्राचार्या पुष्पावती सोनवणे यांनी अभिनंदन केले.त्याचे सितपुर,माहीजळगांव, कापरेवाडी,निमगांव गांगर्डा येथील ग्रामस्थ,तसेच कर्जत येथील नागरीकांकडुन अभिनंदन होत आहे.
ऋषीकेशने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील,मामा आणि त्याला घडवणार्या यशवंत शिक्षण संस्थेच्या गुरुंना समर्पीत केले.