कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे
कर्जत तालुक्यामध्ये सध्या राजकीय परिस्थिती इतकी विचित्र झाली आहे की,कोणता नेता नेमका कोणत्या पक्षात आहे हे आता नेत्यांना देखील लवकर समजत नसल्यामुळे सर्वसामान्य जनतेला कधी समजणार . यामुळे सर्वत्र मिसळ झाली आहे .असे प्रतिपादन युवा नेते राजेंद्र देशमुख यांनी कर्जत येथील गोपाल वाघ यांनी सुरू केलेल्या पुणेरी दरबार मिसळ याच्या उद्घाटनप्रसंगी केले.
यावेळी सचिन चिंचवेकर, ह-भ-प दयानंद महाराज कोरेगावकर माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत व प्रतिभा भैलुमे प्रवीण घुले, सतीश पाटील, प्रसाद ढोकरीकर, दादासाहेब सोनमाळी, सतीश पाटील, उषा राऊत ,विनोद दळवी, अनिल गदादे ,मनीषा सोनमाळी, सुनील यादव, विशाल मेहत्रे, नितीन तोरडमल ,भास्कर भैलुमे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
राज्यामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या दरबार मिसळ या अधिकृत ब्रँडचे कर्जतमध्ये आज मोठ्या उत्साहात मध्ये उद्घाटन करण्यात आले गोपाळ देविदास वाघ यांनी कर्जत कुळधरण रस्त्यावर दरबार मिसळ हे नवीन दालन सुरू केले आहे यावेळी दरबार मिसळ या ब्रँडचे अधिकृत वितरक असणारे सचिन विंचवेकर हे यावेळी उपस्थित होते.अस्सल महाराष्ट्रीयन तडका या नावाने ओळखली जाणारी मिसळ दरबार या ठिकाणी सुरू झाले आहे यामध्ये १८ प्रकारच्या मिसळ नागरिकांना मिळणार आहेत आणि खवय्यांसाठी ही एक पर्वणी याठिकाणी उपलब्ध करून दिली आहे व खास दरबार चहा या ठिकाणी मिळणार आहे.
कर्जत मध्ये अनेक प्रकारच्या मिसळ
मिसळ सेंटरच्या उद्घाटनावरून उपस्थित राजकीय नेत्यांनी राजकीय सर मिसळ व त्याला मिळणारा तडका याबाबत भाषणे केल्यामुळे उपस्थितांची चांगलीच मनोरंजन झाले. त्यातच विनोदाचार्य ह भ प दयानंद महाराज कोरेगावकर यांनी त्यांच्या नेहमीच्या विनोदी शैली मध्ये राजकीय नेत्यांना चिमटे काढत हा उद्घाटन सोहळा चांगलाच रंगवला.
कर्जत तालुक्यामध्ये यापूर्वी एकच प्रकारची मिसळ नागरिकांना मिळत होती. मात्र आता कर्जत करांचा आकर्षण बाहेरील व्यक्तींना देखील मोठ्या प्रमाणामध्ये होत असल्यामुळे येथे इतरही मिसळ ज्या राज्यांमध्ये गाजत आहेत त्या कर्जतकरांना खाण्यासाठी उपलब्ध झाल्या आहेत अशा पद्धतीचे शैलीदार वाक्य फेक करीत उपस्थित नेत्यांनी भाषणे केली तर काही जणांनी आगामी होणाऱ्या निवडणुकीमध्ये याच कार्यक्रमामध्ये उमेदवारांच्या घोषणा देखील करत उपस्थितांना धक्के दिले.
मराठी ब्रँड जगभरात नेणार
यावेळी बोलताना सचिन विंचवेकर म्हणाले की, अनेकवळा महाराष्ट्रातच आपला मराठी ब्रँड खाण्यासाठी मिळत नाही व हे आपले दुर्दैव आहे वही ओळखूनच आम्ही खास महाराष्ट्रीयन मिसळ ब्रँड तयार करून राज्यात व पर राज्यांमध्ये घेऊन गेलो आहेत लवकरच जगभरामध्ये हा मराठी ब्रँड सर्वत्र उपलब्ध होणार आहे आणि यामुळे मला याचा अभिमान वाटतो.
यावेळी ह-भ-प दयानंद महाराज कोरेगावकर. नामदेव राऊत, प्रवीण घुले, अनिल गदादे, मनीषा सोनमाळी, प्रसाद ढोकरीकर यांची भाषणे झाली प्रस्ताविक गोपाल वाघ यांनी केले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र राऊत यांनी केले तर आभार चंद्रकांत राऊत यांनी मानले.