कर्जत मध्ये महिलां साठी प्रथमच अत्याधुनिक जिम सुरू

0
120

कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे

कर्जत मध्ये महिलां साठी प्रथमच अत्याधुनिक जिम सुरू करण्यात आली आहे.या जिमचे उद्घाटन अजिनाथ डोंगरे आणि चंद्रकला डोंगरे या आजी व आजोबा यांच्या हस्ते फीत कापून नातू यश डोंगरे यांनी केले.

यावेळी ह.भ.प.वामन खराडे गुरुजी,माजी मंत्री राम शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, प्रवीण घुले,नामदेव राऊत, प्रतिभाताई भैलुमे,दीपक शहाणे,सचिन पोटरे,दिलीप जाधव,अशोक खेडकर,सचिन घुले,संतोष मेहेत्रे,मनिषा सोनमाळी,डॉ.शबनम इनामदार,मोनाली तोटे,विजय तोरडमल,भास्कर भैलुमे,वस्ताद ईश्वर तोरडमल, नाना कचरे,प्रसाद ढोकरी कर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

कर्जत मध्ये महिलांसाठी अत्याधुनिक पद्धतीची जिम या ठिकाणी प्रथमच सुरू करण्यात आली आहे.यासाठी महिला ट्रेनर ची नियुक्ती करण्यात आली आहे.तर युवक आणि पुरुषांसाठी दोन पुरुष ट्रेनर याठिकाणी देण्यात आली असून आधुनिक पद्धतीची ही जिम या ठिकाणी तयार करण्यात आली आहे.

यश डोंगरे यावेळी बोलताना म्हणाले की,कर्जत शहरामध्ये अत्याधुनिक अशा जिमची आवश्यकता होती आणि हे सर्व पाहून स्ट्रेंथ फिटनेस या नावाने सर्व सोयींनी युक्त अशी जिम तयार केली आहे.सध्या तरुणांमध्ये बॉडी बिल्डिंग आणि सुंदर शरीर,मजबूत देहयष्टी याची आवड मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाल्याची दिसून येतात.याच पार्श्वभूमीवर कर्जत मध्ये युवकांसाठी जिम सुरू केलेली आहे.

राणी डोंगरे यावेळी बोलताना म्हणाल्या की,कर्जत मध्ये महिलांसाठी जिम ही व्यवस्था नव्हती यामुळे महिलांचे आरोग्य चांगले रहावे,यासाठी आम्ही या ठिकाणी आधुनिक पद्धतीची जिम व महिला ट्रेनर अशी व्यवस्था या ठिकाणी केली असून,महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान राणी डोंगरे यांनी केले.

महिला ट्रेनर माया दळवी यावेळी बोलताना म्हणाल्या की,महिलांचे आरोग्य हे खऱ्या अर्थाने अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे.महिला कुटुंबाकडे लक्ष देताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात,यामुळे महिलांच्या आरोग्य जास्तीत जास्त चांगले राहावे व संपूर्ण कुटुंब निरोगी असावी यासाठी खास महिलांसाठी ही जिम सुरू केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here