कर्जत येथील ग्रामदैवत गोदड महाराज या ठिकाणी सहकार पॅनलच्या प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ

0
88

कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे

नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या सहकार पॅनलच्या प्रचाराचा नारळ कर्जत येथील ग्रामदैवत गोदड महाराज या ठिकाणी फोडून प्रचाराचा शुभारंभ काल करण्यात आला.यानंतर शहरांमधून भव्य रॅली काढण्यात आली.त्यानंतर या रॅलीचे रूपांतर प्रचार सभेत झाले.

यावेळी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अंबादास पिसाळ,सुवेंद्र गांधी,अशोक खेडकर,कैलास शेवाळे,शिवाजीराव फाळके,शांतीलाल कोपनर,डॉ.सुनील गावडे,राजेंद्र तोरडमल,आबा पाटील,सचिन पोटरे,सुनील शेलार,सचिन घुले, संयोजक रवींद्र कोठारी, हाके मेजर, रमेश वरकटे, ज्ञानदेव लष्कर,दादा सोनमाळी, स्वप्निल देसाई,वैभव शहा,सुनील यादव,  प्रसाद शहा, अनिल गदादे,संदीप बरबडे, राजेंद्र अग्रवाल,भैया गंधे, ईश्वर बोरा,कमलेश गांधी,दिप्ती गांधी,मनीषा कोठारी, मनीषा वडे,नीता कचरे,मनीषा सोनमाळी विशाल मेहेत्रे,श्रीमंत शेळके,रवींद्र कोहळे,रावसाहेब खराडे,अंकुश दळवी,ईश्वर बोरा यांच्यासह सर्व उमेदवार उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुवेंद्र गांधी म्हणाले की, नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक खऱ्या अर्थाने सभासदांची बँक आहे, सहकार पॅनल च्या चार जागा बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत आणि उर्वरित सर्वच्या सर्व १४ जागांवर सहकार पॅनलचे उमेदवार विजयी होणार आहे.यामध्ये कोणतीही शंका नाही.याचे प्रमुख कारण सहकार पॅनलला सर्व राजकीय पक्षांचा पाठिंबा आहे.केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांनी या बँकेच्या माध्यमातून प्रत्येक लहान मोठ्या व्यक्तीला उभा करण्याचे काम केले आहे.बँकेची व संचालक मंडळाची विरोधकांनी बिनबुडाचे व खोटे आरोप करून प्रतिमा मलीन करण्याचे काम केले.यांनी संस्था अडचणीत आणण्याची पाप केले आहे.यामुळे सभासद त्यांना या निवडणुकीमध्ये त्यांची जागा दाखवतील.

यावेळी बोलताना जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ म्हणाले की स्वर्गीय दिलीप गांधी यांनी मोठ्या परिसरांमधून नगर अर्बन बँकेला व्यापक स्वरूप दिले. अनेक सुशिक्षित बेरोजगार छोटी व्यापाऱ्यांना उभा करण्याचे काम खऱ्या अर्थाने दिलीप गांधी यांनी केले. जगदंबा सहकारी साखर कारखान्या सारखा शेतकऱ्यांची संस्था असलेल्या कारखान्याला देखील शेतकऱ्यांसाठी मदत झाली पाहिजे ही भावना दिलीप गांधी यांनी यावेळी दाखवली.आजही तालुक्यातील शेतकरी व्यापारी व सर्व नागरिक सहकार पॅनल च्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.

यावेळी बोलताना कैलास शेवाळे म्हणाले की यावेळची निवडणूक खऱ्या अर्थाने बिनविरोध व्हावी ही सर्व सभासदांची मागणी होती. दिवंगत नेते दिलीप गांधी यांनी या बँकेसाठी त्यांचे संपूर्ण आयुष्य वेचले. मोठ्या कष्टाने त्यांनी ही बँक केवळ मोठी केली नाही तर तिचा विस्तार देखील केला व त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचा विरोधकांनी चुकीचा प्रचार केला याबद्दल त्यांना मतदार व आगामी काळ कधीही माफ करणार नाही.दिलीप गांधी यांच्या आजपर्यंतच्या कामामुळेच सहकार पॅनलचे चार उमेदवार बिनविरोध झाल्या आहेत व उर्वरित सर्व उमेदवार विजय होतील.

यावेळी बोलताना शिवाजीराव फाळके म्हणाले की माजी केंद्रीय मंत्री व दिवंगत नेते दिलीप गांधी यांनी समाजातील प्रत्येक घटकाला मदत करण्याचे काम त्यांच्या आयुष्यामध्ये केले. आम्ही वेगळ्या पक्षात होतो तरीदेखील त्यांनी कोणासही मदत करताना पक्षीय मतभेद समोर ठेवले नाहीत आणि खऱ्या अर्थानं ही बँक मोठी करण्याचे काम त्यांनी केले आहे कर्जत तालुक्यातून सहकार पॅनल ला सर्वात मोठी आघाडी मिळेल असा मला विश्वास आहे.

यावेळी बोलताना  प्रा विजय कोठारी म्हणाले की, दिलीप गांधी यांनी समाजासाठी व बँकेसाठी चंदनाप्रमाणे आपला देह झिजवला. आमचे कोठारी कुटुंब प्रत्येक निवडणुकीमध्ये यांच्या सोबत राहिले व पुढील काळातही राहणार आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीला दिलीप गांधी यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्य या प्रमाणे वागणूक दिली आहे व यामुळेच अर्बन बँकेचे सर्व सभासद यावेळी सहकार पॅनल च्या सर्व जागा निवडून आणून एक प्रकारे दिलीप गांधी यांना श्रद्धांजली वाहणार आहेत.

यावेळी विष्णुपंत टकले अल्लाउद्दीन काझी ऍड अशोक कोठारी यांची भाषणे झाली प्रस्ताविक डॉक्टर प्रकाश भंडारी यांनी केले तर आभार या कार्यक्रमाचे संयोजक रवींद्र कोठारी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here