कर्जत येथील सर्व सामाजिक संघटनांचे कार्य राज्यामध्ये आदर्श असे सुरू आहे.

0
86

कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे

सर्व सामाजीक संघटना ने सलग वर्षभर अविश्रांतपणे राबविलेली श्रमदान चळवळ कौतुकास्पद आहे.अभिनेत्री आल्यामुळे लोक माझे फॅन आहेत,मात्र या कामगिरीमुळे मी सामाजिक संघटनेची फॅन झाले आहे असे प्रतिपादन आई कुठे काय करते?या मालिकेतील अभिनेत्री गौरी कुलकर्णी यांनी कर्जत मध्ये बोलताना केले.

येथील सर्व सामाजीक संघटना मागील दोन ऑक्टोंबर पासून रोज सकाळी श्रमदान व स्वच्छता अभियान राबवत आहे.यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यासाठी सलग श्रमदान वर्षपूर्ती सोहळा असे कार्यक्रमाचे नाव असून यानिमित्ताने काल सायकल रॅली घेण्यात आली तर मियावकी गार्डन युनिट २ येथे सर्व सामाजिक संघटना,रोटरी क्लब व नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सहा हजार झाडे लावून वृक्षारोपण करण्यात आले विशेष म्हणजे यामध्ये उपस्थित सर्व सेलिब्रिटी हे देखील सहभागी झाले होते.

यावेळी बारामती ॲग्रोचे चेअरमन राजेंद्र पवार, कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या संचालिका सुनंदा पवार,आमदार रोहित पवार,माजीमंत्री प्रा.राम शिंदे,प्रख्यात व्याख्याते गणेश शिंदे,प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले,कॅप्टन संजय चौधरी,यांच्यासह सर्वसामाजीक संघटनेचे सदस्य,तसेच राजकीय सामाजिक व्यापारी शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सर्वप्रथम सकाळी हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये महा वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला,यानंतर सर्व सामाजिक संघटनांचे सदस्य यांना स्मृतिचिन्ह देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला,सामाजिक संघटनांच्या वृक्षारोपण व स्वच्छता अभियान यासाठी मदत करणाऱ्या सर्व दानशूर व्यक्तींचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना आ.रोहित पवार म्हणाले सर्व सामाजिक संघटना,कर्जत नगरपंचायत सर्व नागरिकांच्या सहकार्यातून अत्यंत चांगले काम केले आहे.या बाबीचे आता व्यापक  लोकचळवळीत रूपांतर झाले आहे.मला खात्री आहे कर्जत नगरपंचायत राज्यात नव्हे देशात प्रथम येईल,यापुढील काळात देखील आपल्या वाटचालीस आमच्या शुभेच्छा आहेत.

यावेळी बोलताना माजी मंत्री प्रा.राम शिंदे म्हणाले सर्वांनी एकत्र येत एक वर्षभर रोज सकाळी नित्यनियमाने श्रमदान करून स्वच्छतेचे आणि वृक्षारोपण हे अभियान राबविले आहे.ही मोठी उपलब्धता आहे.सुमारे पाच ट्रेलर कचरा उचलून स्वच्छ कर्जत सुंदर कर्जत ही व्याख्या कृतीत उतरवली आहे.संपूर्ण राज्याने दखल घ्यावी असे आपले काम सुरू आहे.

महाराष्ट्र राज्य अटल पणन अभियानाचे मुख्य व्याख्याते

गणेश शिंदे म्हणाले की, कुठलेही काम प्रामाणिकपणे,मन लावून केल्यास ते पूर्ण होते.येथील सर्व सामाजिक संघटना व नगरपंचायत ने दैदिप्यमान कामगिरी बजावत इतिहास घडविला आहे.

कार्यक्रमाची प्रास्ताविक करताना सामाजिक संघटनेच्या वतीने अनिल तोरडमल यांनी संपूर्ण वर्षभर केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला आभार गटविकास अधिकारी अमोल जाधव यांनी मानले

या वेळी सायकल आणि श्रमदान सहभागा बाबत उपस्थितांमधून चिठ्ठी टाकून विजेत्याला बक्षीस देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here