कर्जत येथील सामाजिक संघटनाचा श्रमदानाचा आदर्श एक दिवस संपूर्ण जगामध्ये दीपस्तंभा सारखा मार्गदर्शक ठरेल – आमदार रोहित पवार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे

कर्जत येथील सामाजिक संघटना त्यांच्या सलग श्रमदानाचा आदर्श एक दिवस संपूर्ण जगामध्ये दीपस्तंभा सारखा मार्गदर्शक ठरेल असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी कर्जत येथे बोलताना केले.

कर्जत येथील सर्व सामाजिक संघटना यांचा सलग श्रमदानाचा आज ५५५ वा दिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी प्रसाद ढोकरीकर यांच्या मळ्यामध्ये जलसंधारण दिनाच्या निमित्ताने आमदार रोहित पवार यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. तसेच लेकीचे झाड या उपक्रमा अंतर्गत  झाडे कर्जत नगर रस्त्यावर लावण्यात आली. तसेच नगरपंचायतच्या माजी वसुंधरा अभियान तीन याचा शुभारंभ करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी सर्व सामाजिक संघटनांची सर्व  शिलेदार,आमदार रोहित पवार, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी संभाजी लांगोर, प्रांत अधिकारी अजित थोरबोले, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव, प्राचार्य संजय नगरकर, कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष उषा राऊत, उपनगराध्यक्ष रोहिणी घुले, माजी नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे,तहसीलदार नानासाहेब आगळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अमित निमकर,वनविभागाचे अधिकारी सागर केदार, तालुका कृषी अधिकारी पद्मनाभन म्हस्के,नगरपंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, उद्योजक दीपकशेठ शिंदे, प्रसाद ढोकरीकर, गटनेते संतोष मेहत्रे,उप गटनेते सतीश पाटील, कॅप्टन संजय चौधरी, सचिन घुले,देवा खरात,कर्जत नगरपंचायत चे सर्व समित्यांचे सभापती व नगरसेवक, दादा पाटील महाविद्यालयाचे छात्र सैनिक व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, कर्जत शहरातील डॉक्टर्स व मोठ्या संख्येने नागरिक व महिला यावेळी उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की, कर्जत नगरपंचायत ने माझी वसुंधरा अभियान स्पर्धेमध्ये राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे. आता प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी सर्व प्रयत्न केलेले असून माझी वसुंधरा तीन चां शुभारंभ देखील आज करण्यात आला आहे. या सर्व स भागामध्ये सर्वात मोठा वाटा कर्जत शहरातील सर्व सामाजिक संघटनांच्या शिलेदारांचा आहे.

गेल्या ५५५ दिवसांपासून ते रोज सकाळी शहरांमध्ये श्रमदान करून स्वच्छता व वृक्षारोपण यांची एक चळवळ त्यांनी याठिकाणी निर्माण केले आहे. या सामाजिक संघटना मुळे खऱ्या अर्थाने कर्जत शहराला एक ओळख संपूर्ण राज्यामध्ये निर्माण झाली आहे व त्यांच्या या उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने राष्ट्रीय छात्र सेनेचे एनसीसी चे केडिट व कर्जत शहरातील सर्व नागरिक व खास करून महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत.

या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे भविष्य काळामध्ये कर्जत शहर हे आदर्श शहर म्हणून ओळखले जाईल असा मला विश्वास वाटतो.यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व सामाजिक संघटनांच्या शिलेदारांचे सुरू असलेल्या कामाबद्दल विशेष कौतुक केले.

आज सर्व सामाजिक संघटना यांच्या ५५५ व्या श्रमदानाच्या निमित्ताने सामाजिक संघटना व नगरपंचायत यांच्या सयूंक्त विदयमानाने आमदार रोहित  पवार आणि सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्जत मधील सर्व नागरिक व महिला यांच्या उपस्थितीमध्ये “लेकीचे झाडं” या उपक्रमाचा मोठा टप्पा पूर्ण केला.त्याचबरोबर माझी वसुंधरा अभियान-३चा शुभारंभ आज ५५५ झाडं लावून करण्यात आला आहे.

ढोकरीकर कुटुंबीयांचे योगदान

आजच्या या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमासाठी प्रसाद ढोकरीकर व त्यांचे बंधू आणि सर्व कुटुंबीय यांनी मोलाचे योगदान दिले,यापूर्वी देखील नगरपंचायत साठी त्यांनी स्वतःची जागा दिली आहे.अशा प्रकारे या कुटुंबाने सामाजिक कार्यामध्ये सतत आपला खारीचा वाटा याठिकाणी उचलला आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!