कर्जत व जामखेड मतदार संघामध्ये घड्याळाचे काटे वेगाने धावणार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे

कर्जत नगरपंचायत चे भाजपचे माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, यांच्यासह अनेक नगरसेवक व पदाधिकारी यांनी भाजपमधून, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे.यामुळे आमदार रोहित पवार यांची मतदार संघावर पकड आणखी मजबूत झाली असून, भाजपची व माजी मंत्री राम शिंदे यांच्या अडचणीत वाढ झाल्याची दिसून येते.

या पक्ष प्रवेशाच्या वेळी आमदार रोहित पवार,बारामती ॲग्रो चे उपाध्यक्ष आबा गुळवे,जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके युवकचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे उद्योजक दीपक शिंदे, सुनील शेलार, विषाल मेहेत्रे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

आज गुरुवारी सकाळी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्ष कार्यालयांमध्ये नामदेव राऊत यांच्यासह काही नगरसेवक व भाजपचे पदाधिकारी तसेच महासंग्राम युवा मंचचे काही प्रमुख यांनी भारतीय जनता पक्षाला सोड चिट्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये सर्वांचा अधिकृत पक्षप्रवेश करून घेण्यात आला या वळी या सर्वांचं स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षाचे चिन्ह असलेले उपरणे गळ्यामध्ये टाकून या सर्वांच्या हातात घड्याळ बांधले.

यावेळी माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्यासह नगरसेविका हर्षदा अमृत काळदाते, उषा अक्षय राऊत, किरण पांडुरंग पाटील, सतीश मधुकर समुद्र, हे नगरसेवक तसेच भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे इरफान सय्यद ,माजी शहराध्यक्ष रामदास हजारे ,युवा मोर्चाचे धनंजय थोरात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बजरंग कदम, रमजान चिंचोली सरपंच दीपक ननावरे, महादेव खंदारे, उमेश जपे, युनूस पठाण, मंगेश नेवसे, भाऊसाहेब पोटरे,मनोज आल्हाट, बबलू साखरे ,कैलास बनकर, अभिजीत गिरी या सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.

कर्जत जामखेड मतदार संघामध्ये भारतीय जनता पक्षाला आमदार रोहित पवार हे सातत्याने धक्के देत आहे आहेत.आज त्यांनी भारतीय जनता पक्षाचा मोठा गट याठिकाणी फोडला व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांचा प्रवेश करून घेतला आहे,यामुळे आगामी होणाऱ्या कर्जत नगरपंचायत,जामखेड नगर परिषद, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकीमध्ये घड्याळाची टिकटिक जोरात आवाज करणारा असून भाजपच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचा बोलबाला तयार करण्यासाठी दमदार पाऊल टाकले आहे.

माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी मागील आठवड्यात भारतीय जनता पक्षाच्या क्रियाशील सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता व कमळाचे फूल सोडून घड्याळ हातावर बांधण्याचे संकेत दिले होते.नामदेव राऊत यांच्या समर्थकांची संख्या कर्जत शहरासह मतदारसंघांमध्ये मोठी आहे.एक तर ओबीसी समाजाचा एक आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडे मतदारसंघांमध् पाहिले जाते,विशेष म्हणजे सर्व समाजातील घटकांना सोबत घेऊन राजकारणापेक्षा समाजकारण करण्याची त्यांची आगळीवेगळी शैली ही त्यांची जमेची बाजू आहे यामुळे, त्यांच्या या प्रतिमेचा आमदार रोहित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना मोठा फायदा होणार आहे.

नामदेव राऊत यांच्या पक्ष सोडल्यामुळे भारतीय जनता पक्षाला भविष्यात मोठे नुकसान होऊ शकते तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस व आमदार रोहित पवार यांची मतदारसंघावरील पकड आणखी घट्ट होण्यास यामुळे मदत होईल.

कर्जत जामखेड मतदार संघामध्ये ओबीसी समाज हा लोकसंख्येने मोठा आहे आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये हा समाज निर्णायक भूमिका घेत असतो भारतीय जनता पक्षाच्या विजयामध्ये ओबीसी समाजाची ताकद ही जमेची बाजू ठरत होती हे ओळखूनच आमदार रोहित पवार यांनी ओबीसी समाजातील हा बडा नेता भाजपमधून फोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोटात आणला आहे.राऊत यांचे संघटन कौशल्य अन्य नेत्यांच्या तुलनेत वाखानण्याजोगी आहे.यामुळे त्यांचा उपयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ मतदारसंघांमध्ये नव्हे तर राज्य मध्ये देखील होऊ शकतो.

सोशल मीडियामध्ये जोरदार वॉर युद्ध

एकूणच राऊत व त्यांच्या समर्थकांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे.आज मतदारसंघातील सोशल मीडियावर समर्थक व विरोधक यांचे अक्षरशः वॉर सुरू होते, एकमेकांवर आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी तसेच वेगवेगळे स्टेटस ठेवून आगामी राजकीय संघर्षाची वाटचाल किती तीव्र आहे हे यामधून जाणवत होते.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!