कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे
कर्जत शहरातील लाकडाच्या वखारीत मध्ये चंदनाच्या लाकडाचा साठा केल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांना मिळाली यांनी तात्काळ त्या ठिकाणी पोलीस पथक पाठवून छापा टाकला व चंदनाचे लाकूड व मुद्देमाल ताब्यात घेतला.
याबाबत घडलेली घटना अशी की दिनांक २४/०९/२०२१ रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव कर्जत विभाग यांना गोपनीय बातमी मिळाली की कर्जत शहरात शेख मोईनुउदीन राहणार कर्जत याची आंबेडकर गेटच्या समोर येथे लाकडाची वखार असून त्याने त्याचे राहते घराचे पहिल्या मजल्यावर चंदनाच्या लाकडाचा साठा करून ठेवला आहे.अशी बातमी मिळताच त्या ठिकाणी पोलीस पथक पाठवून तपासणी केली असता त्याचे राहते घराच्या पहिल्या मजल्यावर ९० हजार रुपये किमतीची चंदनाच्या झाडाचे लाकडी तुकडे सुमारे अंदाजे २२ किलो वजनाचे मिळून आलेले आहेत . या नंतर शेख मोहिनुद्दीन याच्यावर कार्यवाही साठी वनविभाग कर्जत यांचेकडे मुद्देमाल व आरोपीस ताब्यात देण्यात आलेले आहे सबंधित कार्यालयाकडून योग्य ती कार्यवाही चालू आहे.
सदरची अवैद्य चंदन तस्कर वरील सदरची कारवाई ही उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव कर्जत विभाग यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि सतिष गावित ,पोलीस नाईक केशव ह्वरकटे, सागर जंगम घोडके यांनी केलेली आहे.