कर्डीलेंच्या बालेकिल्ल्यातही नीलेश लंके !

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

कर्डीलेंच्या बालेकिल्ल्यातही नीलेश लंके !

नागरिकांना पहाटेपर्यंत नीलेश लंके यांचीच प्रतिक्षा

नगर तालुक्यात मविआ नेते, कार्यकर्ते यांची वज्रमूठ

नगर : प्रतिनिधी

पाथर्डी, शेवगाव, राहुरी तालुक्यात स्वाभिमान जनसंवाद यात्रेस मोठा प्रतिसाद लाभल्यानंतर
नीलेश लंके यांच्या नगर तालुक्यातील मांजरसुंभा, पिंपळगाव माळवी, डोंगरगण, चाफेवडी, जेऊर, शेंडी,पोखर्डी, बुऱ्हाण नगर, कापूरवाडी, नागरदेवळे, दरेवाडी या भागातील झंझावाती दौऱ्यास उदंड प्रतिसाद लाभला.

शनिवारी मांजरसुंभा गवापासून सुरुवात झाल्यानंतर दरेवाडी येथे लंके यांची यात्रा पोहचेपर्यंत पहाटचे ३ वाजले होते. पहाट झाली तरी जागोजागी शेकडोंच्या संख्येने नागरिक लंके यांची वाट पहात होते. हा परिसर मा. आमदार शिवाजी कर्डीले यांचा बालेकिल्ला मानला जातो. याच भागात लंके यांची सभा झाली, त्यात लंके यांनी घणाघाती टीका केली. त्यास उपस्थित लोकांनी टाळ्या आणि शिट्या वाजवत प्रतिसाद दिल्याचे चित्र पहावयास मिळाले.

यावेळी मविआचे गोविंद मोकाटे, रोहिदास कर्डीले, संदीप कर्डीले, संदेश कार्ले,बाळासाहेब हराळ, शरद झोडगे, उद्धवराव दुसुंगे, भाऊसाहेब काळे,राजेंद्र भगत, रामेश्वर निमसे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!