कांदा लिलाव सुरळीत ; शेतकऱ्यांना प्रतिकिलो 13 ते 24 रु. मिळाला भाव..

0
47

नगर तालुका नेप्ती कृषी उपबाजार समितीत १ लाख ४३१ कांदा गोण्यांची आवक

अहमदनगर प्रतिनिधी : नगर तालुका नेप्ती कृषी उपबाजार समितीत सुमारे १ लाख ४३१ कांदा गोण्यांची ( ५०२ विक्रमी गाड्यांची ) आवक झाली असून शेतकऱ्यांना सरासरी प्रतिकिलो 13 ते 24 रु. भाव मिळाला, त्यामुळे शेतकरी वर्ग समाधानी आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य बाजारभाव मिळण्यात नेप्ती कृषी उपबाजार समितीचा राज्यात नावलौकिक आहे. कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे बाजार समिती सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सूळ, संचालक मंडळ नेप्ती उपबाजार समितीत उभा राहून योग्य पद्धतीने नियोजन करत कांदा लिलाव सुरळीत पार पाडला. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here