कानिफनाथ मंदिराचे डोंगर परिसर हिरवाईने फुलणार

0
84

ज्ञानदा प्रतिष्ठान व वन विभागाच्या पुढाकाराने ५५० झाडांची लागवड

अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील कानिफनाथ मंदिराचे डोंगर परिसर हिरवाईने फुलविण्यासाठी ज्ञानदा प्रतिष्ठान व वन विभागाच्या वतीने वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. डोंगर परिसरात 550 झाडांची लागवड करण्यात आली. या अभियानाचा शुभारंभ ग्रामपंचायत सदस्य तथा पर्यावरण प्रेमी  पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते झाला.

यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन हिरवे, संदीप दळवी, अमोल जाधव, ज्ञानेश्‍वर बर्वे, स्वप्निल गवळी, शिवाजी पठारे, शेखर पुंड, जयदीप पादीर, विश्‍वास चेडे, जय पलघडमल, आशिष शहाणे, सचिन सोनुले, महेश ससे, विक्रांत ठुबे, महेश कर्पे, गणेश राऊत, मयुर काळे, मनिष कुलकर्णी आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.

या मोहिमेस नगरसेवक अमोल येवले, संग्राम कोतकर, वन रक्षक रामचंद्र अडागळे, वनपाल अनिल गावडे, वनपरीक्षेत्र अधिकारी सुनिल थेटे यांनी भेट देऊन वृक्षरोपण केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन हिरवे यांनी ज्ञानदा प्रतिष्ठानचे युवक सदस्य मागील पाच वर्षापासून वृक्षरोपण व संवर्धनाचे कार्य करीत आहे. डोंगर परिसरात झाडे लावण्यापासून ते त्याच्या संवर्धनाची जबाबदारी प्रतिष्ठानने घेतली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पै. नाना डोंगरे म्हणाले की, पर्यावरणाप्रती आस्था प्रत्येकाच्या मनात रुजून वृक्षरोपण व संवर्धन झाल्यास पर्यावरणाचा समतोल साधला जाणार आहे. कोरोनाने पर्यावरणासह ऑक्सिजनचे महत्त्व जगा समोर आनले. मनुष्याने काळाची गरज ओळखून या वृक्षरोपण मोहिमेत सहभागी होण्याची गरज आहे. वृक्ष जगले, तर सजीव सृष्टी टिकेल ही भावना प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे. वृक्षरोपण मोहिम ही सामाजिक चळवळ म्हणून पुढे येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या वृक्षरोपण मोहिमेसाठी सामाजिक वनीकरण विभाग व टच फाऊंडेशनच्या वतीने रोपे उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here