शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा निर्धार – महापौर
अहमदनगर प्रतिनिधी – शहरातील रस्ते खड्डे मुक्त करण्याच्या कामास सुरुवात झाली असून,लवकरच शहरातील सर्वच रस्ते चांगले होतील.त्यासाठी आपण स्वत: या कामांवर लक्ष देऊन आहोत.कापड बाजार ते सर्जेपुरा हा शहरातील मुख्य रस्ता असून,या ठिकाणी मोठी बाजारपेठ असल्याने जिल्ह्यातून लोक येत असल्याने बाजारपेठेतील रस्ते चांगले असणे गरजेचे आहे.
त्यामुळेच या रस्त्यावरील सर्व खड्डे चांगल्या पद्धतीने बुजवून रस्ता व्यवस्थीत करण्यात येणार आहे. यंदाच्या पावसाळात रस्त्यातील खड्डयांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागले आहे.आता हे सर्व खड्डे तातडीने बुजावण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे पुढील काळात शहरातील मुख्य रस्ते डांबरीकरण तर काही सिमेंट कॉक्रीटची करण्यात येणार आहे.त्यासाठी राज्य शासनाकडे निधीसाठी पाठपुरवा सुरु असल्याची माहिती महापौर सुरेखा कदम यांनी दिली.
शहराची मुख्य बाजार पेठ कापड बाजार ते सर्जेपुरा रस्त्यांच्या पॅचिंग कामाची पाहणी महापौर रोहिणी शेंडगे व आयुक्त शंकर गोरे यांनी केली.याप्रसंगी माजी विरोधीपक्ष नेता संजय शेंडगे,नगरसेवक गणेश कवडे, इंजि.सुरेश इथापे,इंजि.श्रीकांत निंबाळकर आदि उपस्थित होते.
यावेळी आयुक्त शंकर गोरे म्हणाले,यंदाच्या पावसाळ्यात नगर शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले.गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत असल्याने तात्पुरत्या स्वरुपात खड्डे बुजविण्यात येत.परंतु पुन्हा त्या ठिकाणी खड्डे होतआता या सर्व रस्त्यांचे थ्री लेअरने पॅचिंग करण्यात येत असून,त्यामुळे शहरातील सर्वच रस्त्यांवरील खड्डे लवकर बुजविण्यात येतील.याबाबत आपण संबंधितांना सूचना दिल्या असल्याचे सांगितले.
याप्रसंगी इंजि.सुरेश इथापे यांनी महापौर व आयुक्त यांना रस्त्याच्या कामाची माहिती दिली.