कामगारांच्या जोरावर कंपनी यशाच्या शिखरावर – संतोष लांडे

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेच्या प्रयत्नाला यश ; ईटन इंडस्ट्रियल कंपनीत २१० कामगारांचा करारनामा यशस्वी

कामगारांच्या जोरावर कंपनी यशाच्या शिखरावर – संतोष लांडे

नगर : कामगारांचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी अहमदनगर जिल्हा कामगार संघटना कामगार कार्यालय कडे नेहमीच पाठपुरावा करत असते आणि कामगार कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होत असते. त्यामुळे अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेच्या प्रयत्नाला यश आले आहे. नगर एमआयडीसीतील ईटन इंडस्ट्रियल कंपनीत २१० कामगारांचा दुसऱ्यांदा यशस्वी करारनामा झाला असून कामगारांना सीटीसी पगारा मध्ये  १७ हजार ५३८ रुपयांची भरगोस वाढ झाली आहे. कंपनी व कामगार यांच्यामधील कामगार संघटना ही दुवा आहे. प्रशासन व कामगार यांच्यामधील यशस्वी चर्चा घडवून आणत कामगारांचा उद्धार केला जातो. तसेच त्यांच्या मेहनतीच्या जोरावर कंपनीला देखील यशाच्या शिखरावर घेऊन जाण्याचे काम केले जाते. असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष लांडे यांनी केले.

नगर एमआयडीसीतील ईटन इंडस्ट्रीज कंपनीमधील कामगारांचा अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेच्या वतीने प्रशासनासोबत यशस्वी करारनामा संपन्न झाला यावेळी संघटनेचे अध्यक्ष संतोष लांडे, प्लांट हेड जालिंदर दळवी, एच आर हेड राजेश पेवाल, सुशील खिलारी, देवेंद्र चौधरी,पदाधिकारी किरण दाभाडे, दत्ता तापकिरे, सुनील कदम, संतोष भिंगारदिवे, किरण गुंजाळ, जुबेर शेख कामगार प्रतिनिधी महेश चेडे, कासिम शेख, पमोल पवार, प्रशांत दराडे, गौतम मेटे, अशोक सांगळे, किरण जपे आदीसह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कामगार प्रतिनिधी कासिम शेख म्हणाले की, नगर जिल्हा कामगार संघटनेच्या पाठपुराव्यामुळे ईटन कंपनीतील २१० कामगारांचा करारनामा यशस्वीपणे संपन्न झाला असून हा करारनामा कालावधी ३९ महिन्याचा असून यात कामगारांना सरासरी बोनस २८ हजार ३३३, मेडिक्लेम पॉलिसी ३ लाख, करारनामा फरक १ लाख ५१ हजार ६०० रुपये आदींसह कामगारांचे विविध प्रश्न करारनाम्यात सोडवण्यात आले आहे. तर या झालेल्या करारनाम्याचे कामगारांना वाचन करून दाखवले, यावेळी कामगारांनी जल्लोष करत एकमेकांना पेढे भरवले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!