कामदा ऑटो रायडर्स मध्ये लवकरच इलेक्ट्रिक बाईक दाखल होणार.

0
92

कामदा ऑटो रायडर्स शोरूमचा सातवा वर्धापन दिन उत्साहात साजरा

कामदा ऑटो रायडर्स ने ग्राहकांचा विश्वास संपादन केला: डॉ.दीपक.

अहमदनगर प्रतिनिधी: गेल्या सात वर्षांमध्ये कामदा ऑटो रायडर्स शोरूम च्या माध्यमातून के.टी.एम.व हस्कवर्णा कंपनीच्या नगर जिल्ह्यामध्ये ६०० बाईक वितरित करण्याचे काम केले आहे. या माध्यमातून ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यात आला आहे.

व्यवसाय करीत असताना ग्राहकांना चांगल्या दर्जाचे सुविधा कामदा ऑटो राईडरच्या माध्यमातून दिल्या आहेत. ध्येय चिकाटी व मेहनतीच्या जोरावर हर्ष बत्रा यांनी कामदा ऑटो रायडर्स शोरूम ग्राहकांच्या पसंतीस उतरवीले.त्यामुळे नगर जिल्ह्यातील ग्राहकांनी गाड्या खरेदी करून चांगला प्रतिसाद दिला असे प्रतिपादन नामांकित डॉक्टर दीपक यांनी केले.

नगर मनमाड रोड वर कामदा ऑटो रायडर्स शोरूम च्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त के.टी.एम, आर.सी, 200 टू जनरेशन बाईकचा शुभारंभ करताना डॉ. दीपक, संचालक दिनेश बत्रा, हर्ष बत्रा, हैदराबाद येथील बाईकर बाबा अण्णा, ज्येष्ठ पत्रकार सुभाष गुंदेचा, मोहन मानधना, केके शेट्टी, अभय मिस्त्रि, मिलिंद पागिरे, उदय खिलारी, राकेश गुप्ता, अभिषेक कळमकर, किरण विजन, खुशाल विजन,किरण विप्पण, सुरेंद्र लोढा, विरण जग्गी,सतीश बोथरा आदी मान्यवर उपस्थित होते.

संचालक हर्ष बत्रा म्हणाले की कामदा ऑटो रायडर्सने गेल्या सात वर्षांपूर्वी चार मॉडेलच्या बाईकवर व्यवसाय सुरू केला होता.आता के.टी.एम.व हस्कवर्णा कंपनीच्या 12 मॉडेल च्या गाड्या शोरूम मध्ये दाखल आहे, भारतामध्ये युरोपियन ब्रँड 2012 पासून आहे.125 सीसी पासून तर 790 सीसी पर्यंत बाईकचे मॉडेल उपलब्ध आहे.याच बरोबर 390 अडव्हेंचर बाईक ग्राहकांना लांब प्रवासासाठी सुखकर आहे.

आता लवकरच कामदा ऑटो रायडर्स शोरूम मध्ये इलेक्ट्रिक बाइक उपलब्ध होणार आहे.या गाड्या युवकांच्या पसंतीस मोठ्या प्रमाणात उतरत आहेत असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here