कायदेविषयक जनजागृती शिबिर व फिरते लोक अदालतचे उद्घाटन…

- Advertisement -

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर,बार असोसिएशन,अहमदनगर सेंट्रल बार असोसिएशन अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती शिबिर व फिरते लोक अदालतचे उद्घाटन

अहमदनगर – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,अहमदनगर अहमदनगर बार असोसिएशन,अहमदनगर, सेंट्रल बार असोसिएशन अहमदनगर, यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 3 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हा न्यायालय,अहमदनगर येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम व फिरते लोक अदालत चे उद्घाटन माननीय श्री सुधाकर व्ही यार्लगड्डा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,अहमदनगर यांचे हस्ते करण्यात आले.

त्यांनी अध्यक्षीय भाषणात बोलताना, फिरते लोक अदालतीचा फायदा तळागाळातील लोकांना जास्तीत जास्त कसा होईल याचा विचार करून आपण सर्वांनी वेगवेगळ्या माध्यमातून सर्वांपर्यंत माहिती जाईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन केले.

पुढे ते म्हणाले की, आपल्या बाजूला वावरणाऱ्या व्यक्तींच्या कायदेविषयक काय समस्या आहेत, हे जाणून घेऊन त्यांच्यापर्यंत फिरते लोक न्यायालयाचा संदेश पोहोचावा, यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. ग्रामस्तरावर लोकांचे वाद सामंजस्याने मिटवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्तविक माननीय श्रीमती भाग्यश्री का पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर यांनी केले. प्रास्ताविकात बोलताना त्या म्हणाल्या की, फिरत्या लोक अदालतीसाठी “न्याय तुमच्या दारी” हे ब्रीद लागू होते.

सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मा. विधीज्ञ श्री संजय पाटील,अध्यक्ष, अहमदनगर बार असोसिएशन, अहमदनगर, मा. विधीज्ञ श्री. के.एम.देशपांडे अध्यक्ष, सेंट्रल बार असोसिएशन, अहमदनगर, विधीज्ञ श्री.सतीश पाटील, जिल्हा सरकारी वकील,अहमदनगर ,तसेच अहमदनगर मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी तसेच इतर विधीज्ञ सुरेश लगड, विधीज्ञ विक्रम वाडेकर, विधीज्ञ भूषण ब‌‌‌्हाटे, विधीज्ञ श्री सुनील मुंदडा, श्रीमती स्वाती नगरकर, सदस्य, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, विधीज्ञ राजाभाऊ शिर्के, उपाध्यक्ष,अहमदनगर बार असोसिएशन, विधीज्ञ अनिल सरोदे, मुख्य कायदेविषयक सल्लागार, लोक अभिरक्षक कार्यालय, अहमदनगर व दोन्ही बारचे सदस्य जिल्हा न्यायालयातील सर्व कर्मचारी वर्ग व पक्षकार उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विधीज्ञ श्री अभय राजे, सदस्य, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर यांनी केले.सूत्रसंचालन विधीज्ञ श्रीमती अंजली केवल यांनी केले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles