कारपेंटिंग दलाचे शुभारंभ
अहमदनगर (प्रतिनिधी) – अहमदनगर शहरात नावाजलेले कार पेंटिंग क्षेत्रातील अमजद खान पेंटर यांच्या अमजद पेंड्स या दालनाचे नगर औरंगाबाद रोड सिटी लॉन समोर दुकानाचे शुभारंभ फित कापून करताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर व माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, नगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष रोहिदास कर्डिले, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अथर खान, जावेद शेख, उपाध्यक्ष समीर पठाण, निखिल शेलार, सुशील कदम, मुकेश झोडगे, नगर तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष मोहसीन पठाण, शरद ठाणगे, अमोल वाघ आदी उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर म्हणाले की, शहरामध्ये नावाजलेले कार पेंटिंग क्षेत्रातील अमजद पेंड्स ची उत्तम सेवा असल्याने नागरिक प्रतिसाद देणार असल्याची भावना व्यक्त केली व सर्व मान्यवरांचा सत्कार फ्रमचे संचालक अमजद खान यांनी केले तर आभार युसूफ खान, रईस खान यांनी मांनले.