कार्यरत शिक्षकांमधूनच उमेदवार देण्यासाठी शिक्षक एकवटले

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

कार्यरत शिक्षकांमधूनच उमेदवार देण्यासाठी शिक्षक एकवटले

कचरे यांच्या उमेदवारीला टीडीएफ मधूनच विरोध

अधिकृत नसलेल्या पदाधिकाऱ्यांनी अनाधिकृतपणे उमेदवारी घोषित केल्याचा आरोप

पाचही जिल्ह्यातील टीडीएफच्या पदाधिकाऱ्यांशी समन्वयाने उमेदवाराची घोषणा करणार  

अहमदनगर (प्रतिनिधी) – अहमदनगर जिल्हा टीडीएफ (महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी) व माध्यमिक शिक्षक संघाच्या सहविचार सभेत नुकतेचे टीडीएफची उमेदवारी मिळाल्याची घोषणा झालेल्या भाऊसाहेब कचरे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविण्यात आला आहे. तर अहमदनगर जिल्हा टीडीएफ जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील टीडीएफच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन शिक्षण क्षेत्रात कार्यरत व टीडीएफ मधील सक्रीय शिक्षकाला सर्वानुमते उमेदवारी जाहीर केली जाणार असल्याचे घोषित करण्यात आले. तर जे टीडीएफचे अधिकृत पदाधिकारी नाही, त्यांनी घोषणा केलेला उमेदवारही अनाधिकृत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून टीडीएफने सेवानिवृत्त शिक्षक भाऊसाहेब कचरे यांना उमेदवारी जाहीर केल्याने टीडीएफमध्ये नवा वाद पेटला असून, सक्रीय टीडीएफचे पदाधिकारी सर्वांच्या सहमतीने नवीन उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. शहरातील माध्यमिक शिक्षक सोसायटीत राज्य माध्यमिक शिक्षक संघटना फेडरेशनचे उपाध्यक्ष चांगदेव कडू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सहविचार सभेसाठी टीडीएफचे जिल्हाध्यक्ष एम.एस. लगड, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, सचिव राजेंद्र खेडकर, विठ्ठलराव पानसरे, महेंद्र हिंगे, बाळासाहेब मुळे, प्रशांत होन, संभाजी गाडे, उमेश गुंजाळ, बाळकृष्ण चोपडे, देविदास पालवे, धनंजय गिरी, बबन लांडगे, प्रसाद साठे, साहेबराव रक्टे, कैलास मोकळे, बाळासाहेब जठार, पंकज जगताप, बाबासाहेब गुंजाळ, संतोष ठाणगे, प्रसाद साठे, भानुदास तमनर आदींसह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष नानासाहेब बोरस्ते नसून विजय बहाळकर आहेत. महासचिव हे पदच संघटनेच्या कार्यकारिणीत नाही, परंतु सध्या स्वयंघोषित असलेले बोरस्ते व हिराला पगडाल यांनी नाशिक विभागाची उमेदवारी जाहीर करताना पुणे येथे पाच लोक उपस्थित होते. त्यावेळी उमेदवारी जाहीर करण्यात आली, तर इतर चार जिल्ह्याचे अध्यक्ष निषेध नोंदवून निघून गेले. नुकतेच नाशिकचे संदीप गुळवे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली, त्यामुळे सध्याची टीडीएफ बोगस असल्याचे सिद्ध झाले आहे. चार भिंतीच्या आत बसून टीडीएफचा उमेदवार निवड करायचा हे शिक्षकांना मान्य नाही. त्यामुळे दोन दिवसांमध्ये नाशिक विभागीय टीडीएफची बैठक घेण्यात येणार आहे. यामध्ये नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यामधून सेवेत असणारे पदाधिकारी एकत्र बसून उमेदवारी बाबत निर्णय घेणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

एम.एस. लगड म्हणाले की, टीडीएफच्या उमेदवाराची समन्वय समितीने विश्‍वासात न घेता नाशिक विभाग शिक्षक आमदार निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केला आहे. दिलेला उमेदवार आम्हाला मान्य नाही. अधिकृत उमेदवार सर्वांना विचारात घेऊन जाहीर केला जाणार असून, कचरे यांना अहमदनगर जिल्हा टीडीएफ व माध्यमिक शिक्षक संघाचा पाठिंबा नसल्याचे त्यांनी सांगितले.

आप्पासाहेब शिंदे म्हणाले की, ज्यांनी उमेदवारी जाहीर केली त्यांना टीडीएफचा उमेदवार जाहीर करण्याचा अधिकार नाही. कार्यरत शिक्षकाला उमेदवारी मिळावी व तो निवडून यावा हीच सर्वांची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. मुस्ताक सय्यद यांनी आर्थिक देवाण-घेवाण करुन टीडीएफची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. टीडीएफशी संबंध नसताना त्या उमेदवाराला उमेदवारी मिळाली कशी? हा प्रश्‍न उपस्थित करुन नवीन उमेदवार देण्यासाठी पाच सदस्यांची कमिटी नेमण्याची त्यांनी भूमिका मांडली.

प्रास्ताविकात राजेंद्र खेडकर यांनी शिक्षकात कार्यरत असलेला व शिक्षकांच्या प्रश्‍नावर लढणारा उमेदवारच शिक्षक आमदार झाल्यास शिक्षकांचे प्रश्‍न सुटणार असल्याचे स्पष्ट केले. दादासाहेब देशमुख म्हणाले की, शिक्षकांचे प्रश्‍न सोडविणारा आणि शिक्षकांना आधार देणाऱ्या व्यक्तीच्या मागे सर्वांनी उभे रहावे. टीडीएफच्या विरोधात काम करणाऱ्यांना तिकीट देऊ, उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!