किरण काळे धडाडीचे नेतृत्व – ना. बाळासाहेब थोरात
अहमदनगर प्रतिनिधी : किरण काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून किरण काळे युथ फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या दहा दिवसीय किरण अहमदनगर फेस्टिव्हलच्या माध्यमातून या शहरातील क्रीडा,कला रसिकांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याचे काम होईल,असा विश्वास राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना.सुनील केदार यांनी व्यक्त केला आहे.
शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या फेस्टिवलच्या उद्घाटन प्रसंगी ना.केदार बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात होते. यावेळी फाउंडेशन व अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य किरण फुटबॉल चॅम्पियनशिप लीगचे उद्घाटन व किरण कराटे प्रीमियर लीगचा बक्षीस वितरण समारंभ ना.थोरात व ना.केदार यांच्या हस्ते पार पडला.
काळे यांचा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते.या सोहळ्यासाठी राज्याचे काँग्रेसचे दोन जेष्ठ हेवीवेट मंत्री,पक्षाचे तीन आमदार तसेच शहर व जिल्ह्यातील काँग्रेससह, शिवसेना,विविध संघटना यांचे पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मान्यवर या वेळी मंचावर उपस्थित होते. यावेळी काळे यांच्या कार्यकर्त्यांनी तसेच शहरातली क्रीडाप्रेमींनी या समारंभासाठी मोठी गर्दी केली होती.यामुळे सावेडी उपनगरासह संबंध नगर शहरामध्ये काळे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याची चर्चा सर्वत्र सुरू होती.
यावेळी बोलताना ना.केदार म्हणाले की,किरण काळे यांनी माझ्या क्रीडा विभागाकडे नगर शहरासाठी अनेक मागण्या मांडल्या आहेत.शहरातील खेळाडूंना उत्तम प्रकारच्या क्रीडाविषयक पायाभूत सुविधा मिळाव्यात असा त्यांचा माझ्याकडे आग्रह आहे.राज्याचा क्रीडा खात्याचा मंत्री या नात्याने किरण काळे यांच्या विनंतीला मान देऊन या शहरासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही मी देतो असे यावेळी ना.केदार यांनी सांगितले.
ना.बाळासाहेब थोरात म्हणाले की किरण काळे हे या शहरातल धडाडीच नेतृत्व आहे.केवळ त्यांच्या अभिष्टचिंतनासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो आहोत.त्यांच्यामध्ये या शहरासाठी काम करण्याची प्रचंड ऊर्जा असून तळमळ आणि विकासाचे व्हिजन त्यांच्याकडे आहे. माझ्यासह राज्य सरकार मधील काँग्रेसचे सगळे मंत्री त्यांच्या पाठीशी या शहराच्या विकासासाठी खंबीरपणे उभे राहतील, असे प्रतिपादन यावेळी थोरात यांनी केले.
यावेळी काळे यांचे दोन्ही मंत्र्यांनी सत्कार करून अभिष्टचिंतन करत काळे यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.आ.संग्रामदादा थोपटे, आ.लहू कानडे,आ.डॉ.सुधीर तांबे यांनी देखील यावेळी काळे यांना शुभेच्छा दिल्या.ना.थोरात,ना.केदार यांच्यासारखे काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री,पक्षाचे तीन-तीन आमदार माझ्या सारख्या एका सर्वसामान्य, छोट्या कार्यकर्त्याच्या अभिष्टचिंतनासाठी वेळात वेळ काढून अहमदनगर नगरीमध्ये आल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण गीते यांनी केले. सूत्रसंचालन राजेंद्र टाक यांनी केले.तर आभार जोएब खान यांनी मानले. गुलमोहर स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर पार पडलेल्या या सोहळ्याला प्रताप शेळके, गॉडविन डिक,गोपीचंद परदेशी,डॉ.पठारे, बाळासाहेब बोराटे,भगवान फुलसौंदर,अनंतराव गारदे, मनोज गुंदेचा,खलील सय्यद, निजाम जहागीरदार,प्रसाद पाटोळे,कनोजिया सर, योगीराज गाडे,संदेश कार्ले, दशरथ शिंदे,शरद झोडगे, बाळासाहेब साळुंके, बाळासाहेब हराळ,संपतराव म्हस्के,बाबासाहेब गुंजाळ, संग्राम शेळके,तुषार पोटे, रघुनाथ झिने,हर्षवर्धन कोतकर,दीप चव्हाण,ॲड.अक्षय कुलट,अनिस चुडीवाला,विशाल वालकर,ॲड.अनिता दिघे,जुबेर सय्यद,डॉ.हनिफ शेख,स्मितल बाबळे, शरद गीते, सखाराम गीते,मच्छिंद्र साळुंखे,नारायण कराळे,वैभव देशमुख,आदित्य क्षीरसागर, अमित बडदे,सुरज गुंजाळ,आदील सय्यद,तेजस रासकर, कल्पना देशमुख आदींसह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.