पाटोदा तालुक्यात कुत्र्याच्या लसचा तुटवडा
अंमळनेर प्रतिनिधी – सुनिल आढाव
पाटोदा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुत्र्याच्या लसीचा तुटवडा असल्यामुळे कुत्रे चावल्यानंतर लस घेण्यासाठी पाटोदा तालुक्यातील नागरीकांनी अहमदनगर जिल्ह्यात जाण्याची वेळ आली आहे .
पाटोदा तालुक्यातील अंमळनेर ,डोंगरकिंन्ही ,नायगाव ,वहाली या आरोग्य केंद्रात सध्या कुत्रे चावल्यानंतर देण्यात येणारी लसच उपलब्ध नसल्यामुळे नागरीकांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे.
पाटोदा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुत्रे चावल्यानंतर देण्यात येणारी लस नसल्यामुळे नाविलाजाने नागरीकांनी कुत्र्याची घेण्यासाठी पर जिल्ह्यात जाण्याची वेळ आली आहे या रुग्णांना आर्थीक झळ व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे .
पाटोदा तालुक्यातील गावात सध्या कुत्र्याची मोठी संख्या वाढली आहे त्यातच काही कुत्रे पिसाळलेले देखील आहेत यामुळे पाटोदा तालुक्यातील गावात दररोज कुठे ना कुठे कुत्रे चावल्याच्या घटना घडत आहेत यामुळे आरोग्य विभागाने तात्काळ पाटोदा तालुक्यातील आरोग्य केंद्रात लस उपलब्ध करण्याची मागणी करण्यात येत आहे .
——–
पाटोदा तालुक्यातील आरोग्य केंद्रात कुत्रे चावल्यानंतर लस कधी उपलब्ध होणार आहे या बाबत माहिती विचारण्यासाठी पाटोदा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एल.आर.तांदळे यांच्या शी संपर्क साधाला असता त्यांच्या शी संपर्क होऊ शकला नाही यामुळे त्यांची बाजु समजु शकली नाही.
——–
पाटोदा तालुक्यातील आरोग्य केंद्रात कुत्रे चावल्यानंतर देण्यात येणारी लस संपली आहे हि माहिती आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांना माहिती असते परंतु लस कधी उपलब्ध होणार या बाबत मात्र वैद्यकीय अधिकारी यांना कसलीच माहिती नसते .