कुळधरण येथे कुकडीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचे सुमारे दोन तास रस्ता रोको आंदोलन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे

कर्जत तालुक्यातील कुळधरण येथे कुकडीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी आज सुमारे दोन तास रस्ता रोको आंदोलन केले.अधिकाऱ्यांनी पाणी पुन्हा सुरू असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

कुकडीचे आवर्तन कर्जत तालुक्यामध्ये सोडण्यात आली होती.मात्र ज्या भागामध्ये पाणी मिळाले नाही त्या परिसरातील शेतकरी आंदोलन करीत आहेत.यामध्ये आज कुकडीच्या पाण्यासाठी कुळधरण येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेतकऱ्यांनी पाणी मिळावे यासाठी रस्ता रोको आंदोलन केले.

या आंदोलनामध्ये अशोक जगताप,संदीप सुपेकर,मंगेश जगताप,पोपट सुपेकर,नितीन गुंड,संजय गुंड,राहुल निंबोरे,राहुल सुपेकर,चांगदेव सुपेकर,बाळू सुपेकर,भाऊ सुपेकर,शिवाजी चोरमले,बापूराव सुपेकर,विजय पावणे यांच्यासह कुळधरण, पिंपळवाडी,धालवडी,राक्षसवाडी, कर्मनवाडी,बारडगाव दगडी येथील शेतकरी सहभागी झाले होते.

या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांनी टेल टू हेड आवर्तन असताना या परिसरातील साऱ्यांना शेवटच्या भागाकडे पाणी मिळाले नाही याबद्दल उपस्थित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

यावेळी बोलताना अशोक जगताप म्हणाले की,या परिसरामध्ये गेल्या दोन वर्षापासुन कुकडीच्या आवर्तन मिळत नाही यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. पाणी न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिके जळून चालली आहेत.

यावेळी बोलताना राहुल निंबोरे म्हणाले की,कुकडीच्या पाण्याबाबत दोन वर्षांपासून भोगळ कारभार सुरू आहे. या पूर्वीच्या काळामध्ये वर्षभरात चार ते पाच वेळा कुकडीचे  पाणी मिळत होते.परंतु मागिल दोन वर्षापासुन दोनच पाणी मिळत आहेत आणि ते पण पुर्ण क्षमतेने मिळत नाही.

भाजपच्या सरकारने “टेल‌ टू‌ हेड” या नियमानुसार शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळत होते पण आता शेतातील उभी पिके जळून चालली आहे.शेतकरी हवालदिल झाला आहे, या सर्वा कारणाना वैतागलेल्या शेतकऱ्यानी सुमारे दोन तास रस्ता रोको करून आपला रोष प्रशासणाला दाखवला आहे.

यावेळी आंदोलकांशी चर्चा करून घटनास्थळी असलेले पोलिस प्रशासन,पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कार्यकारी अभियंता यांनी लवकर पुन्हा पाणी सोडण्यात येईल असे अश्वासन दिले यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!