कुस्तीपटू कुटुंबातील सर्व सदस्यांकडे धरणार मतदानाचा आग्रह

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

कुस्ती संकुलात मतदार जागृती

कुस्तीपटू कुटुंबातील सर्व सदस्यांकडे धरणार मतदानाचा आग्रह

अहमदनगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने भाळवणी (ता. पारनेर) येथील गुरुकुल कुस्ती संकुलात मतदार जागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी कुस्तीपटूंना कुटुंबातील सर्व सदस्यांना मतदानाचा आग्रह करण्याचे आवाहन करण्यात आले. कुस्तीपटूंनी कुटुंबातील सर्व सदस्यांना मतदानाचा हक्क बजाविण्यास लावणार असल्याचा संकल्प केला.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या निर्देशानुसार हा उपक्रम राबविण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी प्रगल्भ लोकशाहीसाठी घरच्या मंडळींना मतदानासाठी आग्रह धरण्याचा व त्यांच्याकडून मतदानाचा हक्क बजावण्यासंदर्भात कुस्तीपटूंना शपथ दिली. यावेळी आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच पै. गणेश जाधव, युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदीप डोंगरे आदींसह कुस्तीपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी आई-बाबा, आजी-आजोबा व कुटुंबातील सदस्यांना मतदान करण्यासाठी आग्रह करणार असल्याचा संकल्प केला. जना मनाची पुकार आहे, मतदान आमचा अधिकार…, घरोघरी साक्षरता घेऊन जाऊ, मतदात्यांना जागरुक बनवू… अशा विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या. यावेळी कुस्तीपटूंना मतदार माहिती पुस्तीकाचे वाटप करण्यात आले.

पै.नाना डोंगरे म्हणाले की, शंभर टक्के मतदान झाल्यास योग्य उमेदवार निवडून येणार आहे. नागरिकांचा मतदान प्रक्रियेत पूर्णत: सहभाग वाढल्यास लोकशाही बळकट होणार आहे. लोकशाही सदृढ होण्यासाठी युवकांसह प्रत्येक नागरिकांचा मतदान प्रक्रियेत सहभाग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमासाठी नेहरु युवा केंद्राचे उपनिदेशक शिवाजी खरात, जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!