कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये सोयाबीन ची आवक सुरू

0
98

अहमदनगर  प्रतिनिधी – कृषि उत्पन्न बाजार समिती, अहमदनगरकडून सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवाना कळविण्यांत येते की बाजार समितीचे मुख्य यार्डचे भुसार विभागामध्ये सोयाबीन या शेतमालाची आवक सुरु झाली आहे .

काल गुरुवार दिनांक २३/०९/२०२१ रोजी ५०० से ६०० डाग आवक आली आहे. त्यास जास्तीत जास्त बाजारभाव प्रति क्विंट्स रुपये ५०००/- ते ६३००/- सरासरी इतका मिळाला आहे.

तरी सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवानो आपला शेतमाल विक्रीसाठी सुकवून व स्वच्छ करून आणावा जेणे करुन शेतकऱ्यांना त्यांचे सोयाबीन या शेतमालास जास्तीत जास्त बाजारभाव मिळेल, असे आवाहन बाजार समितीचे सभापती अभिलाष रावसाहेब घिगे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here