कृषी विद्यापीठाच्या मैदानावर रंगली जिल्हास्तरीय वरिष्ठ गट मैदानी स्पर्धा
300 खेळाडूंचा सहभाग; स्पर्धेतील विजेत्यांची राज्य स्पर्धेसाठी निवड
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय वरिष्ठ गट मैदानी स्पर्धा राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मैदानावर उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत मुलांमध्ये निखिल आव्हाड, ज्ञानेश्वर काळे, किशोर मरकड तर मुलींमध्ये उषा गुढीपाटी, ईश्वरी दराडे, विश्वेषा मिस्कीन व कोमल बनकर यांनी विविध गटात विजय मिळवला आहे. या स्पर्धेतील विजेत्यांची राज्य स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन संघटनेचे सुनील जाधव व राजेंद्र कोतकर यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले. या स्पर्धेमध्ये संपूर्ण जिल्ह्यामधून 300 खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेसाठी पंच म्हणून रमेश वाघमारे, संदीप घावटे, जगन गवांदे, श्रीरामसेतू आवारी, समीर शेख, अमित चव्हाण, गुलजार शेख, शिल्पा म्हात्रे, राघवेंद्र धनलगडे, सुजित बाबर, जिल्हा संघटनेचे सचिव दिनेश भालेराव यांनी काम पाहिले.
या स्पर्धेमधील प्रथम तीन क्रमांकाच्या खेळाडूंची नागपूर येथे 1 ते 3 जून दरम्यान होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महावीर सिंग चौहान व क्रीडा अधिकारी डॉ. विलास आवारी यांनी मैदान उपलब्ध करून दिल्याबद्दल संघटनेच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.
अहमदनगर जिल्हा वरिष्ठ गट मैदानी स्पर्धा निकाल पुढीलप्रमाणे- (अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय) पुरुष गट 100 मीटर धावणे- निखिल आव्हाड, शिवम लगड, गणेश गाढवे, 200 मीटर धावणे- निखिल आव्हाड, ज्ञानेश्वर काळे, ऋषिकेश कर्डिले, 400 मीटर धावणे – ज्ञानेश्वर काळे, ओमकार दहिफळे, निखिल माऊलकर, 800 मीटर धावणे- शेखर लंके, निलेश बोराडे, विशाल गायकवाड, 1500 मीटर धावणे- प्रवीण राऊत, कृष्णा गायके, आकाश शिंदे, 5000 मीटर धावणे- सागर सदगीर, प्रवीण राऊत, प्रसाद गव्हाणे, 20 किलोमीटर चालणे- सुनील हापसे, गौरव रसाने, निखिल सलालकर, 3000 मीटर ट्रिपल चेस- किशोर मरकड, प्रसाद गव्हाणे, सम्यक राजगुरू, गोळा फेक- समर्थ सकट, रुपेश धनलगडे, सौरभ कदम, भाला फेक-ऋषी कुर्हे, गौतम गीते, ऋषिकेश, थाळी फेक- श्रीनिवास कराळे, ऋषिकेश धनलगडे, उपेश धनलगडे, लांब उडी- दहिफळे जगदीश, बोरुडे सोहम, अष्टेकर अनंता, तिहेरी उडी- बोरुडे सोहम, आव्हाड सोहम, गौरव मढवई.
महिला 100 मीटर धावणे- उषा गुढीपाटी, निकिता दवणे, ईश्वरी दरोडे, 200 मीटर धावणे- ईश्वरी दरोडे, ऋतुजा फलके, पुनम धोत्रे, 400 मीटर धावणे- उषा गुडीपाटी, सानिका शिंदे, आरती कोलते, 800 मीटर धावणे- वर्षा धानापुणे, कोमल सापते, वैष्णवी शिंदे, 1500 मीटर धावणे- सुवर्णा शिरसाट, संयुक्त गारदे, आरती कोलते, 5000 मीटर धावणे- डांगे गायत्री, शिरसाट सुवर्णा, संयुक्ता गारदे, 20 किमी चालणे- वैष्णवी खेडकर, कोमल शिरसाठ, गोळा फेक- विश्वेषा मिस्किन, निकिता दवणे, गीता जाधव, भालाफेक- नेहा मोरे, साक्षी मोरे, माधुरी कदम, थाळीफेक- विश्वेषा मिस्किन, आलिशा निकाळे, लांब उडी- बनकर कोमल, पवार प्राजक्ता, डोंगरे साक्षी, तिहेरी उडी- बनकर कोमल, पवार प्राजक्ता, डोंगरे साक्षी.