कृषी विभागाच्या वतीने राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानातंर्गत शेतकऱ्यांना ज्वारी बियाणे वाटप

0
78

पारनेर प्रतिनिधी -निलेश जाधव

तालुक्यातील किन्ही – बहिरोबावाडी गावातील १०० शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानातंर्गत शनिवारी शेतकरी नेते अनिल देठे पाटील यांच्या हस्ते ज्वारी बियाणे वाटप करण्यात आले.कृषी विभागामार्फत दरवर्षी दोन्ही हंगामाच्या सुरवातीला शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत काहि पिकांचे मोफत सुधारित बियाण्यांचे वाटप करण्यात येते.त्या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी किन्ही येथील ५० व बहिरोबावाडी येथील ५० शेतकऱ्यांना प्रति ४ किलो प्रमाणे ज्वारी बियाणे वाटप करण्यात आले.सुरूवातीला शेतकऱ्यांकडून बियाणे मागणीचे अर्ज मागविण्यात आले व शनिवारी प्रत्यक्ष कृषी सहाय्यक श्रीमती माधुरी बोऱ्हुडे यांनी गावात येऊन उपस्थित शेतकऱ्यांना सर्वांच्या सहमतीने बियाणे वितरीत केले.

यावेळी किन्ही ग्रामपंचायत च्या सरपंच पुष्पा खोडदे , उपसरपंच हरेराम खोडदे तसेच शेतकरी भागाशेठ व्यवहारे,बापु व्यवहारे,पांडुरंग व्यवहारे , भिमा व्यवहारे , एकनाथ व्यवहारे , बाबासाहेब व्यवहारे , बाळासाहेब शिंदे , शरद व्यवहारे , बाबाजी व्यवहारे , राजेंद्र व्यवहारे , सुनिल साबळे , मोहन मोढवे , बाजीराव पवार , साहेबराव देठे , साहेबराव पवार , सहादु व्यवहारे , शंकर व्यवहारे , भिकाजी व्यवहारे , अमोल देठे , आदिनाथ व्यवहारे , छगन भांबरे , संपत व्यवहारे ,लक्ष्मण व्यवहारे , प्रविण आचार्य , शिवाजी आचार्य , चेतन पवार , दत्तु व्यवहारे , विशाल देठे , रामदास व्यवहारे , किरण व्यवहारे सौ.कोमल व्यवहारे आदी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here