केंद्रातील आयुष्यमान भारत योजना राज्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना मोठा आधार -अनिल शिंदे

0
95

शिवसेनेच्या वतीने नवीन मतदार व आयुष्यमान भारत योजनेची नाव नोंदणी

नागरिकांमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीबद्दल जागृती

अहमदनगर (प्रतिनिधी)- मतदान प्रक्रियेत नवीन मतदारांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी व केंद्रीय आयुष्यमान भारत योजनेद्वारे आरोग्य सेवेचा लाभ सर्वसामान्य वर्गाला मिळण्यासाठी शिवसेनेच्या वतीने प्रभाग क्रमांक 15 मधील आगरकर मळा, रेल्वे स्टेशन व नगर-कल्याण रोड परिसरात नवीन मतदार व आयुष्यमान भारत योजनेसाठी ऑनलाईन नाव नोंदणी अभियान राबविण्यात आले. या अभियानास युवकांसह ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, तब्बल साडेचार हजार नागरिकांना याची लाभ घेतला. तर राज्यात गरजू रुग्णांना तातडीने आर्थिक मदत देवून नवजीवन देणाऱ्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीबद्दल यावेळी माहिती देण्यात आली.

डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तसेच मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे उपजिल्हाप्रमुख श्री ओंकार अनिल शिंदे यांच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे प्रारंभ शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांच्या हस्ते झाले.

यावेळी  झेंडे काका, विकास मुळे, श्रीधर नागरे, दत्तात्रय फुलसौंदर, विरेंद्र कांबळे, शरद दानवे, सोनू खोसे, शुभम कावळे, ओंकार थोरात, रामा ठोंबे आदींसह परिसरातील नागरिक व युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
अनिल शिंदे म्हणाले की, सदृढ लोकशाहीसाठी युवकांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदविण्याची गरज आहे. सर्वसामान्यांचे हित पाहणारे आपले सरकार राज्यात आहे. आर्थिक परिस्थिती नसलेल्या व्यक्तींना केंद्र सरकारची आयुष्यमान भारत योजना तर राज्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून मोठा आधार मिळाला आहे. केंद्र व राज्याच्या कल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळवून देण्यासाठी शिवसेना कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे उपजिल्हाप्रमुख ओंकार शिंदे म्हणाले की, आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून 5 लाखापर्यंत मोफत उपचार मिळणार आहे. याच्या नोंदणीसाठी 31 ऑगस्ट पर्यंत मुदत वाढ करण्यात आली आहे. तर डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करुन दिली जात आहे. तातडीने मिळणारी मदत गरजू रुग्णांसाठी नवसंजीवनी ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

या अभियानात नवीन मतदारांना नांव नोंदणीसह नागरिकाना मतदान यादीतून नाव कमी करणे, एकाच मतदार संघात नाव स्थलांतरीत करणे, नाव, वय व पत्ता दुरुस्तीसाठी अर्ज भरुन घेण्यात आले. आधारकार्ड संबंधित ऑनलाईन अर्ज देखील स्विकारण्यात आले.

केशरी व पिवळे रेशन कार्डधारक ज्यांचे नाव यादीत नाही, त्यांचे नाव आयुष्यमान भारत योजनेच्या यादीत समाविष्ट करण्यात आले. या योजनेद्वारे कुटुंबाला 5 लाख रुपयाचे वैद्यकीय खर्च सरकारी तसेच निवड केलेल्या खाजगी दवाखान्यात मोफत उपचार मिळणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीबद्दल अधिक माहितीसाठी 9665666668 या नंबरवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here