केंद्रीय पत्रकार संघटनेत हजारोंच्या संख्येनं पत्रकारांचा सहभाग;केली विक्रमी नोंद

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

“आधी शांती, मग क्रांती” संघटनेचं तत्व

 

अहमदनगर प्रतिनिधी – अल्पावधीतच महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात सेंट्रल प्रेस जर्नलिस्ट असोसिएशन अर्थात केंद्रीय पत्रकार संघ,पत्रकारांच्या या राष्ट्रीय संघटनेनं आपले वर्चस्व स्थापन करण्यास सुरुवात केली आहे.

पत्रकारांचा विकास व सुरक्षा हे संघटनेचं एकमात्र उद्दिष्ट आहे त्यासाठी “आधी शांती मग क्रांती” या तत्वावर आम्ही आमचे कार्य करत असतो, पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी कोणतेही पाऊल उचलण्यासाठी संघटना हि सदैव तयार आहे असे केंद्रीय पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर यांनी सांगितले आहे.

खास करून महाराष्ट्रात जर पाहिलं तर, मागील महिन्याभरात हजारोंच्या संख्येनं पत्रकारांनी संघटनेत सहभाग घेत विक्रमी नोंद केली आहे.यामध्ये छपाई माध्यमे (प्रिंट मीडिया), इलेक्ट्रॉनिक माध्यमे, सोशल मीडिया, यु-ट्यूब वृत्तवाहिनी, न्यूज वेब पोर्टल्स, ई.चे संपादक, उपसंपादक, पत्रकार पुरुष व महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला आहे.

मुळात संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष कमलेश गायकवाड यांच्या बुद्धि कौशल्यामुळे संघटनेला एक वेगळेच आकर्षण निर्माण झाल्याचं दिसून आलं आहे.

दरम्यान महाराष्ट्र कार्याध्यक्ष विनायक कांगणे,महाराष्ट्र सचिव राजू दळवी यांच्या उत्कृष्ट अश्या व्यवस्थापन कौशल्यामुळे संघटनेला बळकटी प्राप्त झाली आहे.

महाराष्ट्रातील अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, हिंगोली, जळगाव, कोल्हापुर, मुंबई, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, रायगड, पालघर, कोकण, ई. अगदी सर्वच जिल्ह्यांमध्ह्ये केंद्रीय पत्रकार संघटनेचे पदाधिकारी आपले कर्तव्य अगदी निष्ठेने पार पडत आहेत.

महाराष्ट्राच्या बाहेर म्हटलं तर कर्नाटक, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, चेन्नई, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पंजाब ई. राज्यांमध्ये सुद्धा केंद्रीय पत्रकार संघटनेनं आपले बीज रोवले आहे.

जो कोणी नागरिक पत्रकाराच्या भूमिकेत येऊन समाजकंटकांना संबंधित प्रशासनासमोर आणतो तो प्रत्येक नागरिक हा केंद्रीय पत्रकार संघटनेचा एक अविभाज्य घटक होऊ शकतो असे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर यांनी म्हटलं आहे.

संघटनेच्या सोशल मीडिया सेलच्या माध्यमातून सर्वसाधारण नागरिक सुद्धा संघटनेत प्रवेश करू शकतो असे राष्ट्रीय अध्यक्षांनी म्हटलं आहे.

दरम्यान केंद्रीय पत्रकार संघटनेत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक सभासदाला उच्च दर्जाचे ओळखपत्र सुद्धा प्रदान करण्यात येत आहे.भविष्यात संघटनेच्या प्रत्येक सभासदाला मानधन सुद्धा देण्याची व्यवस्था करणार असल्याचे संघटनेच्या व्यवस्थापन समितीने सांगितले आहे.

जास्तीत जास्त पत्रकरांनी तसेच इतर नागरिकांनी केंद्रीय पत्रकार संघात सहभाग घ्यावा असे आवाहन राष्ट्रीय उपाध्यक्ष कमलेश गायकवाड यांनी केले आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!