केंद्रीय मंत्री ना.नारायण राणे यांच्या बेकायदेशीर अटकेच्या निषेधार्थ भाजपाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

अहमदनगर प्रतिनिधी – केंद्रीय मंत्री ना.नारायण राणे यांना बेकायदेशीरपणे करण्यात आलेल्या अटकेच्या निषेधार्थ नगर शहर जिल्हा भाजपाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करुन निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, ज्येष्ठ नेते वसंत लोढा, सुनिल रामदासी, सचिन पारखी, महेश नामदे, बाळासाहेब गायकवाड, किशोर बोरा, तुषार पोटे, वसंत राठोड, अजय चितळे, महेश तवले, अनिल गट्टाणी, संतोष गांधी, विशाल खैरे, अमित गटणे आदि उपस्थित होते.

     तसेच जिल्हा पोलिस अधिक्षक यांना भाजपाच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई येथे झालेल्या दसरा मेळाव्यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांच्या विरोधात चिथवणीखोर व भडकावू भाषण केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी केली.

     याप्रसंगी भैय्या गंधे म्हणाले, एखाद्या केंद्रीय मंत्र्याला बेकायदेशीर अटक करुन दिलेली वागणुक ही महाराष्ट्र सारख्या पुरोगामी राज्यात घडत आहे, ही घटना दुर्दैवी आहे. जर केंद्रीय मंत्र्याला अशी वागणुक मिळत असले तर सर्वसामान्यांचे काय? असा प्रश्न उपस्थित होते आहे. राज्य सरकार आपले अपयश झाकण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करत आहे. राज्यात अनेक प्रश्न निर्माण झाले आहे, परंतु शासन त्याकडे डोळेझाक करुन खरे बोलणार्‍यांवर  गुन्हे दाखल करत आहेत. हे दडपशाहीचे राजकारण असून, त्यास भारतीय जनता पार्टी सडेतोड उत्तर देईल. आपले मंत्री, आमदार, कार्यकर्ते यांच्याकडून सत्तेचा दुरोपयोग होत असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची तत्परता न दाखवता भाजपाच्या कार्यकर्त्यांवर विनाकरण गुन्हे दाखल केले जात आहे. केंद्रीय मंत्री असलेले ना.राणे यांच्यावर ज्या पद्धतीने कारवाई केली ती, हुकुमशाही व मुस्काटदाबी करणारी आहे. नारायण राणे केंद्रात मंत्री झाल्याने सरकारच्या पायाखाली वाळू सरकू लागली आहे. त्यातून आलेल्या नैराश्यातून अशी कृत्ये घडत आहे. या घटनेचा निषेध करुन यापुढे अशी प्रकारचे कृत्य झाल्यास त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल, असेही गंधे यावेळी म्हणाले.

     याप्रसंगी सुनिल रामदासी म्हणाले, राडा संस्कृती ही भाजपाची नसून केंद्रीय मंत्र्यांना ज्या पद्धतीने अटक केले जाते ती चुकीची असून, राज्य सरकार सत्तेचा दुरोपयोग करत आहे. भाजपाचे वाढत्य प्राबल्य व जनतेचे मिळत असलेले पाठबळ यामुळे सरकार अस्वस्थ झाले आहे. राज्य सरकार जनतेच्या प्रश्न सोडविण्यात पूर्णत: नाकाम ठरले असून, ना.नारायण राणे यांच्या जन आशिर्वाद यात्रेमुळे भाजपाला मिळत असलेल्या उत्स्फुर्त प्रतिसादामुळे त्यांना अशाप्रकारे रोखण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप यावेळी केला.

     यावेळी सुमित बटुळे, शशांक कुलकर्णी, प्रशांत मुथा, सुजित खरमाळे, उमेश साठे, ऋग्वेद गंधे, लक्ष्मीकांत तिवारी, आशिष आनेचा, प्रणव सरनाईक आदि उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!