केंद्र सरकारच्या ऑनलाइन पोर्टलचा व्यापाऱ्यांनी लाभ घ्यावा – जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

केंद्र सरकारच्या ऑनलाइन पोर्टलचा व्यापाऱ्यांनी लाभ घ्यावा – जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे


आडते बाजार व्यापारी असोसिएशनची बैठक संपन्न

 

नगर : केंद्र सरकारने डाळीचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांकडील साठ्याची माहिती उपलब्ध असावी यासाठी ऑनलाइन पोर्टल सुरु केले असून जास्तीत जास्त व्यापाऱ्यांनी आपली नावनोंदणी करून आपल्याकडील असलेल्या डाळीच्या साठ्याची माहिती अपलोड करावी,  साठ्याचा अहवाल १५ दिवसाला शासनाला पाठवण्यात येतो. केंद्र सरकारने डाळीच्या साठ्याबाबत ज्या मर्यादा घालून दिल्या त्याबाबतची चर्चा करण्यासाठी आडते बाजार व्यापारी असोसिएशनची बैठक घेत माहिती देत लवकरात लवकर व्यापाऱ्यांनी या पोर्टलचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांनी केले.

केंद्र सरकारच्या ऑनलाइन पोर्टलबाबत अहमदनगर जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांनी आडते बाजार व्यापारी असोसिएशनची बैठक घेत मार्गदर्शन केले यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक गांधी, उपाध्यक्ष गोपाळ मणियार, बाजार समिती संचालक राजेंद्र बोथरा, संतोष बोरा, रमेश सोनीमंडलेचा, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी मीनाक्षी चौधरी, अन्न धान्य वितरण अधिकारी सपना भोवते इतर अधिका-यांसह व्यापारी बांधव उपस्थित होते.

संतोष बोरा म्हणाले की, पूर्वी आपल्याकडील मालाचा साठा आपण कागदावर लिहून सरकारला पाठवत होतो, मात्र आता तंत्रज्ञानाच्या युगात ऑनलाईन पद्धत सुरु झाली असून केंद्र सरकारच्या ऑनलाइन पोर्टलवर व्यापारी बांधवानी आपल्याकडील मालाच्या साठ्याची माहिती भरावी, केंद्र सरकारने माल साठ्याची जी मर्यादा दिली आहे त्या खालीच आपण सर्व जण आहोत तरी सर्व व्यापाऱ्यांना ऑनलाईन नावनोंदणी करणे कायदेशीर बंधनकारक आहे. शासनाचे प्रतिनिधी थेट आपल्या दारात आले आहे, तरी सर्वच व्यापाऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा आणि २२ मे रोजी मार्केट यार्ड मधील व्यापाऱ्यांसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती त्यांनी दिली.
- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!