केडगांव – नेप्ती रोडसाठी शिवसेनेच्यावतीने नगर-पुणे रस्त्यावर रास्ता रोको

0
163

नगर प्रतिनिधी – केडगांव शिवसेनेच्यावतीने (ठाकरेगट) केडगांव ते नेप्ती बाजार समितीकडे जाणार्‍या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत नगर-पुणे रस्त्यावर विभागप्रमुख संग्राम कोतकर यांच्या नेतृत्वाखाली रस्तारोको आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी डॉ.श्रीकांत चेमटे, गोरक्षनाथ ठुबे, बाबासाहेब शिंदे, संतोष डमाळे, बाबासाहेब मोढवे, दत्ता कोतकर, आसाराम ठुबे, अमोल कोतकर, अविनाश मुसळे, साहिल शेख, राहुल पवार, दादा चन्ने, ऋषी बाराहाते, अनिकेत साळवे, मुन्ना शिंदे, रवी कोतकर, झरेकर, रोकडे, आठरे आदिंसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते.

     सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप विभागीय अधिकारी यांनी लेखी पत्र देत दि. 2 ऑगस्ट 2023 पासून सदर रस्त्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

     केडगांव – नेप्ती रस्त्यावर मागील अनेक वर्षापासून  अनेक मोठेमोठे खड्डे पडलेले असून त्यामध्ये पाणी साचल्याने अपघात होत असतात. तसेच अनेकांना अपंगत्व आलेले आहे. सदरील भागातील नागरिकांना या त्रासाला कायमच सामारे जावे लागत आहे. यापूर्वीही या रोडसाठी अनेक सामाजिक संस्थांनी व मीही निवदेन दिलेले आहे.

काही महिन्यापूर्वी कामाची सुरुवात झालेली होती. परंतु सदर रस्त्याचे काम हे अत्यंत संथगतीने चालू होते. परंतु काही महिन्यापासून तेही काम बंद आहे. माहिती मिळाली आहे की, सदरील रोडचे टेंडर झालेले असून त्याची वर्क ऑर्डर संबंधित ठेकेदाराला मिळूनही रस्त्याचे काम जलदगतीने पूर्ण होत नाही. या विरोधात हे रस्तारोको आंदोलन करणात आले.

     याप्रसंगी कोतवाल पोलिस स्टेशनच्यावतीने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रस्ता रोको मुळे  काहीकाळ वाहतुक ठप्प झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here