केडगावच्या मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी साकारली अफझल खान वधाची नाटिका

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

सरस्वती प्राथमिक विद्या मंदिरची शिवजयंती मिरवणुक उत्साहात

 

अहमदनगर प्रतिनिधी – विक्रम लोखंडे

केडगाव येथील डॉ. हेडगेवार शैक्षणिक संकुल संचलित सरस्वती प्राथमिक विद्या मंदिरची छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची मिरवणुक उत्साहात पार पडली. विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, सईबाई, सोयराबाई आदी शिवकालीन मावळ्यांची वेशभूषा परिधान करुन मिरवणुकीत सहभागी झाले होते.

मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी साकरलेली अफझल खान वधाच्या नाटिकेने सर्वांचे लक्ष वेधले. या मिरवणुकीत शिवाजी महाराजांची पालखी, घोडे, लेझीम व ढोल पथक आकर्षण ठरले. प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष दादाराम ढवाण, शालेय शिक्षण समितीचे उपाध्यक्ष दत्ताजी जगताप, नगरसेवक मनोज कोतकर यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेची आरती करून मिरवणुकीला प्रारंभ झाले. चौका-चौकात मिरवणुक पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. ज्ञानसाधना क्लासचे संस्थापक प्रसाद जमदाडे व केडगाव व्यापारी संकुलच्या वतीने या मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले.

केडगाव देवी मंदिर परिसरात मिरवणुक आल्यावर निशा उद्योग समूहाचे संचालक जालिंदर कोतकर व शाळेचे पदाधिकारी यांच्या हस्ते शिवरायांची आरती पार पडली. आर्या पारधे या विद्यार्थिनीने पोवाडा सादर केला. प्राचार्य संदीप भोर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

यावेळी विश्‍वस्त दत्तात्रय जगताप, व्यापारी असोसिएशनचे भुषण गुंड, प्रकाश चंगेडिय, गणेश जाधव, राजू लोंढे, सोमा बनकर, अजित पवार, राजू भंडारी, अजय भापकर, गजेंद्र पाटील, सचिन पोखरणा, राजू कुलथे आदींसह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!