केडगाव अंबिकानगरला युवक-युवतींमध्ये गीत गायनातून मतदार जागृती

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील अंबिकानगरला युवक-युवतींमध्ये गीत गायनातून मतदार जागृती करुन सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व सांगण्यात आले. अहमदनगर जिल्हा प्रशासन, जिल्हा निवडणूक विभाग, नेहरू युवा केंद्र, श्री नवनाथ युवा मंडळ, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय, गिगाबाईट कॉम्युटर इन्स्टिट्यूट व एकता सामाजिक फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने जनजागृतीसाठी हा कार्यक्रम घेण्यात आला.

अंबिकानगर येथील गिगाबाईट कॉम्युटर इन्स्टिट्यूट मध्ये गीतकार सुनिल महाजन यांनी मतदानाची टाळाटाळ करायची नाय…., घर अंगण स्वच्छ ठेऊन रोगराई टाळायची हाय… आदी गीत सादर करुन युवकांना मतदान व सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगितले. ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी कोणत्याही प्रलोभन, दबाव व आमिषाला बळी न पडता मतदान केल्यास सक्षम उमेदवार निवडून येणार आहे. यामुळे शहरासह गावाचा व राज्याचा सर्वांगीन विकास साधला जाणार आहे. मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज असून, मतदान शंभर टक्के झाल्यास खर्‍या अर्थाने लोकशाही असतित्वात येणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे म्हणाले की, रोगमुक्त समाज घडविण्यासाठी सार्वजनिक स्वच्छता महत्त्वाची आहे. युवकांनी स्वच्छतेसाठी पुढाकार घेऊन बदल घडविण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गिगाबाईट कॉम्युटर इन्स्टिट्यूटचे बाबासाहेब वायकर यांनी राज्य घटनेने दिलेल्या मुलभूत अधिकार पैकी मतदानाचा मुलभूत अधिकार मतदारांनी बजावला पाहिजे.

लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे मतदान प्रक्रिया आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी अठरा वर्षानंतर युवकांनी मतदार यादीत नांव समाविष्ट करुन घेण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थित युवक-युवतींनी मतदानाचे हक्क बजावण्याची व सार्वजनिक स्वच्छतेची शपथ देण्यात आली. यावेळी अतुल फलके, प्रतिभा डोंगरे, निरंजन घोडके आदी उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!