अहमदनगर प्रतिनिधी : विक्रम लोखंडे
केडगाव येथील बँक कॉलनीतील श्री साईबाबा फौंडेशनच्या साईबाबा मंदिराचा 9 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. यानिमित्त 16 ऑगस्ट पर्यंत साई सच्चरित्र ग्रंथ पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचा प्रारंभ मयुर वसंतलाल शेटिया यांच्या हस्ते सपत्नीक ग्रंथपूजन करून करण्यात आला.
यावेळी फौंडेशनचे अध्यक्ष अजित कातोरे, उपाध्यक्ष सुनील कुलकर्णी, अजितसिंग दाढीयाल, अशोक जाधव, कावेरी जाधव, प्रकाश वाघ,डॉ.मुकुंद शेवंगावकर, संगिता कातोरे, नगरसेवक अमोल येवले ,नगरसेवक संग्राम कोतकर, अभिजित कोतकर, विठ्ठल कोतकर, बबलू कोतकर, कोळी काका ,दडियाल भाभी ,गारकर मावशी आदी उपस्थित होते.
या सोहळ्यात दि.15 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता श्री साईबाबा पालखी सोहळा आणि सायंकाळी 5 वाजता प्रसाद शेटे यांची साई भजन संध्या होणार आहे. दि.16 ऑगस्ट रोजी काकडा आरती व सकाळी 9.30 वाजता शिर्डी येथील माधुरीताई शिंदे यांचे प्रवचन, 12 वाजता पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते मध्यान्ह आरती व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. या सोहळ्यात साईभक्तांनी सहभागी होण्याचे आवाहन फौंडेशनतर्फे करण्यात आले आहे.