अहमदनगर जिल्हा व शहर केमिस्ट असोसिएशनच्या वतीने केमिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार शिंदे यांचा वाढदिवस सामाजिक व धार्मिक उपक्रमानी साजरा
वैदिक पध्दतीने यज्ञ तर स्वामी विरजानन्द कन्या गुरूकुलमध्ये वस्तूरुपी मदत
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा व शहर केमिस्ट असोसिएशनच्या वतीने अखिल भारतीय केमिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार जगन्नाथ (आप्पासाहेब) शिंदे यांचा वाढदिवस सामाजिक व धार्मिक उपक्रमानी पार पडला. शहरातील सावेडी येथील स्वामी विरजानन्द कन्या गुरूकुलमध्ये वस्तूरुपी मदत देऊन वैदिक पध्दतीने यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते.

रामायण व महाभारत काळात ज्या पध्दतीने वाढदिवस साजरे व्हायचे त्याप्रकारे आमदार शिंदे यांचा वैदिक पध्दतीने केमिस्ट असोसिएशनचे संचालक संजयजी गुगळे व अनिलजी गांधी यांच्या संकल्पनेतून वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी गुरूकुलातील ब्रह्मचारिणींनी वेद मंत्राचे उच्चारण करत आमदार शिंदे यांच्या शतायुषी, निरोगी, यशस्वी आयुष्यासाठी प्रार्थना केली.
याप्रसंगी गुरूकुल च्या आचार्या विश्रुतिजी यांनी भारतीय संस्कृतीने (वैदिक पद्धतीने) जन्मदिन साजरा करण्याचे महत्त्व सांगितले. तर जीवनात यशस्वीतेकडे जाताना परोपकारी गुणाने गरजू घटकांची मदत करण्याचे त्यांनी आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक संजय गुगळे यांनी केले. केमिस्ट असोशिएनचे जिल्हा सचिव राजेंद्र बलदोटा यांनी आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या कार्याचा आढावा घेतला. शहर अध्यक्ष दत्ता गाडळकर यांनी केमिस्ट असोसिएशनच्या वतीने सुरु असलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली.
यावेळी अनिल गांधी, ज्ञानदेव यादव, अभय मुथा अमित धोका, अमित धाडगे, शरद डोंगरे, अविनाश साळुंखे, हेमंत गुगळे, कमलेश गुंदेचा, डॉ. विनय शहा, अशोक बलदोटा, मनोज खेडकर, किरण रासकर आदी केमिस्ट सदस्य उपस्थित होते.