कैकाडी समाज संघटनेच्या वतीने राष्ट्रसंत कैकाडी महाराज यांची २१ वी जयंती साजरी
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा कैकाडी समाज संघटनेच्या वतीने राष्ट्रसंत कैकाडी महाराज यांच्या २१ व्या जयंती निमित्त अहमदनगर येथिल शिवपार्वती मंगल कार्यालय येथे कैकाडी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली व त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर दरवर्षी समाजातील गुणवंतांचा सत्कार करून सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले.
यावर्षी महाराष्ट्र राज्य स्वच्छ शाळा व सुंदर शाळा या अभियानात भिंगार हायस्कूल, या शाळेला जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून देणारे शाळेच्या पर्यवेक्षिका मनीषा प्रफुल्ल गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. व अविरत सेवेचे व्रत अंगीकारुन शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या निस्पृह सेवेच्या सन्मानार्थ सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी समाजातील मान्यवर मा.गटशिक्षण अधिकारी बाबासाहेब जाधव, डि.आर. गायकवाड, कारभारी गायकवाड सर, किशोर जाधव सर, हौशीराम गायकवाड, बाबासाहेब जाधव, विशाल माने व ह.भ.प. दुधाडे महाराज मांडवगण आदीसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.