अहमदनगर प्रतिनिधी – (२९ जुन २०२२)
शहरातील तोफखाना पोलिसांच्या हद्दीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की , कोठला अ.नगर येथे शहा स्टील फर्निचर शेजारी,कुरेशी हॉटेल पाठीमागे , पत्र्याचे शेड मध्ये ता जि . अहमदनगर येथे इसम नामें सालीम बाकर कुरेशी हा महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंशी जनावरांचे कत्तल करण्याची मनाई असतांना ही गोवंशी जातीचे जिवंत जनावरे डांबून ठेवून त्यांना अमानुषपणे वागवून त्याची कत्तल करुन गोमांसची विक्री करण्याचे उददेशाने जवळ बाळगुन आहे आत्ता गेल्यास मिळून येतील अशी बातमी पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती.
पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी तत्काळ पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पवार, पोलीस नाईक शंकर चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल योगेश सातपुते,पोलीस नाईक लक्ष्मण खोकले,पोलीस नाईक रविकिरण सोनटक्के,पोलीस नाईक सचिन आडबल यांचे पथक तयार करून कारवाई करा असा तोंडी आदेश दिला होता.त्यानुसार अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बातमीतील नमुद ठिकाण कोठला,अ.नगर येथे जावुन खात्री केली असता शहा स्टिल शेजारी अंदाजे रात्री ०९/०० वा . सुमारास एका पत्र्याचे शेड मध्ये एक इसम जनावरांचे कत्तल करुन मांस तोडतांना दिसला व सदर ठिकाणी रक्ताचा सडा पडलेला दिसला.
सदर ठिकाणी असलेल्या इसमास ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याचे नाव सालीम बाकर कुरेशी,वय १९, रा . व्यापारी मोहल्ला,अ.नगर असे असल्याचे सांगुन मी स्वता करत असल्याचे सांगितले.
सदर ठिकाणीची पाहणी केली असता त्यांचे वर्णन खालील प्रमाणे
१ ) ६७,५०० / – अंदाजे किमतीचे ४५० किलो वजनाचे गोमांस अंदाजे
२ ) २०० / – अंदाजे किमंतीचे एक धारदार सुरी किअं .
३ ) २०० / – अंदाजे किमंती चा एक लोखंडी सत्तुर
६७,९०० /- रकमेचे वरील वर्णनाच्या गोमांस मिळून आल्याने पोलीस नाईक लक्ष्मण खोकले यांनी मा.पशुवैदयकिय अधिकारी अहमदनगर यांना मिळालेले गोमासांचे तुकडे गोवंशीय आहे.अगर कसे यांची करीता पशुवैदयकिय अधिकारी यांनी गोमासाची पाहणी करून प्रयोगशाळेमध्ये जमा केले.
दिनांक २८/०६/२०२२ रोजी रात्री ०९/०० वा.सुमारास कोठला अ.नगर येथे शहा स्टील फर्निचर शेजारी,कुरेशी हॉटेल पाठीमागे , पत्र्याचे शेड मध्ये इसम नामे सालीम बाकर कुरेशी,वय १९ ,रा. व्यापारी मोहल्ला,अ.नगरहा महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंशी जनावरांचे कत्तलकरण्याची मनाई असातंना ही गोवंशी जातीचे जिवंत जनावरांची कत्तल गोमांस विक्री करताना पकडण्यात आल्याने त्यांचे विरुध्द स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल योगेश अशोक सातपुते यांनी तोफखाना पोलिसांमध्ये भादवी कलम २६९ ,३४ महाराष्ट्र पशुसंरक्षण (सुधारणा) अधिनियम सन १९९५ चेकलम ५ (क),९ प्रमाणे फिर्याद दाखल करून आरोपीला अटक केली आहे पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय जपे हे करत आहेत.
सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल,शहर उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके,पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे,पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप कचरू पवार, पोलीस नाईक शंकर चौधरी,पोलीस कॉन्स्टेबल योगेश सातपुते,पोलीस नाईक लक्ष्मण खोकले,पोलीस नाईक रविकिरण सोनटक्के,पोलीस नाईक सचिन आडबल, तसेच कारवाई कामी तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय जपे,पोलीस कॉन्स्टेबल सचिन जगताप यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे