कोयत्याने जीव घेणा हल्ला करणार्‍या संशयित अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
अहमदनगर – शहरातील रेसिडेन्शिअल महाविद्यालयाच्या गेटवर बुधवारी दिनांक 2 रोजी सकाळी युवकावर कोयत्याने जीव घेणा हल्ला करणार्‍या चार संशयित अल्पवयीन मुलांना तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, जखमी युवकावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून त्याचा जबाब तोफखाना पोलिसांनी नोंदविला आहे. त्यावरून आठ ते नऊ जणांविरूध्द खूनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर तालुक्यातील चास येथील विद्यार्थी नगर शहरातील न्यू आर्ट्स कॉलेजमध्ये बारावीच्या वर्गात शिक्षण घेतोय. तो केडगाव ते न्यू आर्ट्स कॉलेजपर्यंत महानगरपालिकेच्या बसने ये-जा करत असतो. बुधवारी सकाळी केडगाव येथून बसमध्ये बसून तो कॉलेजकडे येत असताना माळीवाडा येथून त्याच्या ओळखीचा एक जण बसमध्ये बसला.सिटवर बसण्याच्या कारणातून त्या दोघांमध्ये वाद झाले. वाद घालणार्‍या युवकाने फोन करून त्याच्या इतर मित्रांना कॉलेजजवळ बोलावून घेतले.

फिर्यादी युवक रेसिडेन्शिअल महाविद्यालयाच्या गेटवर उतरताच त्याला आठ ते नऊ जणांनी शिवीगाळ करून मारहाण केली तर एकाने कंबरेला खोसलेला कोयता काढून डोक्यात वार केला. यामध्ये फिर्यादी युवक गंभीर जखमी झाला आहे. हल्ला करणारे सर्व जण अल्पवयीन असून ते केडगाव, सारसनगर, रेल्वे स्टेशन परिसरातील असून त्यातील चौघांना तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतरांचा शोध पुलीसाकडून सुरू आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!