अहमदनगर प्रतिनिधी – महेश कांबळे
श्री क्षेत्र कोरठण खंडोबा मंदिरातील आरतीच्या वेळी शंखनाद करणारे दोन्हीही श्वान(कुत्रे)हारपल्या नंतर आरतीच्या वेळी त्या श्वानांची आठवण भाविक भक्तांना येत होती.
आळे ता.जुन्नर येथील सुप्रसिध्द जोतिष विशारद संजय किसन भुजबळ यांनी आज मातोश्री सौ.यमुनाबाई भुजबळ,चिरंजीव श्रीरुद्,कन्या कुमारी गायत्री आणि कुमारी भुवनेश्वरी यांच्या समवेत आणलेल्या गोंडस श्वानाचे दान कोरठण खंडोबा मंदिराला भेट दिले.
यामुळे आता आरतीच्या वेळी शंखनाद ऐकण्याचा प्रत्यय भाविकांना पुन्हा येणार आहे.कोरठण गडाचे मंदिर दर्शनासाठी उघडल्या नंतर प्रथमच हे श्वानाचे दान आले आहे.कोरठण गडाचे अध्यक्ष ऍड.पांडुरंग गायकवाड यांच्या हस्ते भुजबळ परिवाराचा शाल,श्रीफळ आणि खंडेरायाची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले.