जेऊर येथील संतुकनाथ विद्यालयात स्नेहबंधतर्फे व्याख्यान
अहमदनगर प्रतिनिधी – नागरिक घराबाहेर पडताना कोरोना प्रतिबंधक नियमांना तिलांजली देत असल्याचे दिसून येत आहे.अनेक ठिकाणी कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून गर्दी केली जात आहे,मास्कचा देखील वापर केला जात नाही,लक्षात ठेवा कोरोना अजून संपलेला नाही,नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन बाल आरोग्य तज्ञ डॉ. अजित ठोकळ यांनी केले.

जेऊर बायजाबाई येथील श्री संतुकनाथ इंग्लिश विद्यालयात स्नेहबंध सोशल फाउंडेशनतर्फे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
याप्रसंगी स्नेहबंध चे अध्यक्ष उद्धव शिंदे, प्राचार्य सुरेश भिंगारदिवे, उपमुख्याध्यापक प्रकाश वाघमारे, बाळासाहेब साळुंके, सिताराम बोरुडे, विजय चव्हाण, संकेत शेलार उपस्थित होते.
डॉ. ठोकळ म्हणाले, कोरोना आटोक्यात आला असला तरी नागरिकांनी नियम पाळणे आवश्यक आहे. बाजारपेठेत नागरिकांनी गर्दी केल्याचं चित्र देखील अनेक ठिकाणी दिसत आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
कोरोनाची तिसरी लाट आली, तर आपण कुणाला दोषी धरणार आहोत?विद्यार्थ्यांनी चांगले करियर करण्यासाठी इंजिनीअरिंग,मेडिकल तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करावी,असेही डॉ.ठोकळ यांनी सांगितले.
स्नेहबंध चे अध्यक्ष शिंदे म्हणाले, विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा जपून वापर करावा. मोबाईलवर खेळणे कमी करावे, शिक्षकांचे ऐकावे, चांगले फळ मिळेल. आयुष्यात प्रत्येकाने ध्येय ठरवून त्या दिशेने वाटचाल करावी. प्रास्ताविक भारती मगर यांनी, तर सूत्रसंचालन सुरेखा वाघ यांनी केले.