नगरच्या यश शाह ची पश्चिम विभागीय स्पर्धेसाठी निवड
अहमदनगर प्रतिनिधी – कोल्हापूर जिल्हा झोनल आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत सातारा येथील लाल बहादूर शास्त्री कॉलेजने कोल्हापूरच्या डी.आर के कॉलेजचा अंतिम स्पर्धेत पराभव करून मानाचा करंडक व विजेतेपद पटकाविले.या स्पर्धेत कोल्हापूर विद्यापीठच्या १२ महाविदयालयातील निवडक खेळाडूंचा समावेश होता.

सातार्याच्या लाल बहादूर शास्त्री कॉलेजचे खेळाडू यश शाह,हर्षल जाधव,नरेंद्र गोगावले,हर्शिद ठाकूर, अनिरुद्ध मयेकर व अक्षय कदम या खेळाडूंची पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ (वेस्ट झोन)स्पर्धेसाठी निवड झाली आहे.नुकत्याच या स्पर्धा इस्लामपूर (ता.सांगली) येथे पार पडल्या.
यातील यश शाह हा नगरचा उदयोन्मुख खेळाडू असून सातारा येथील लाल बहादूर शास्त्री येथे एम.कॉम.चे शिक्षण घेत आहे.तर नरेंद्र गोगावले हा अल्ट्रा कार्पोरेट प्रा.ली या कंपनी सेवेत आहे.या खेळाडूंनी मिळवलेल्या या उतुंग यशाबद्दल त्यांचे कॉलेजचे प्राचार्य रवींद्र शेजवळ,फिजिकल डायरेक्टर प्रा.विकास जाधव यांनी अभिनंदन केले.
यश शाह हा अहमदनगरचे वृत्तछायाचित्रकार अनिल शाह यांचा मुलगा असून २०१९ ला त्याने महाराष्ट्र राज्याचे (१९ वयोगटातील) एकेरी व दुहेरी विजेतेपद मिळवून मानाचा मुकुट पटकाविला होता. यशने आजपर्यंत राज्य व राष्ट्रीय स्थरावरील बॅडमिंटन स्पर्धेत हि महाराष्ट्राच्या टीम मधून खेळून मोठे यश संपादन केले आहे.
पुणे येथे यश हा चैतन्य नाईक या प्रशिक्षकाकडून बॅडमिंटनचे धडे गिरवत आहे.करोनाच्या प्रादुर्भावामुळे २०१९ नंतर प्रथमच बॅडमिंटनच्या स्पर्धा सुरु झाल्या आहेत. यशच्या व टीमच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.