कोविड महामारीमध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सुरक्षा व आरोग्य विभागाचे उपसंचालक स्वप्निल देशमुख व जी के एन कंपनीची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने घेतली नोंद;सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट ने केले सन्मानित
अहमदनगर प्रतिनिधी – अनिल शहा
औद्योगिक सुरक्षितता वाढीस लागावी तसेच कामगारांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी नगर जिल्ह्यातील विविध कंपन्या व कारखाने यांच्या माध्यमातून सुरक्षा व आरोग्य विभागाचे उपसंचालक स्वप्निल देशमुख यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या मार्ग ( म्युचअल एड रिस्पॉन्स ग्रुप ) या संघटनेने न भूतो ना भविष्यती असे कार्य केले.त्याच बरोबर कोरोना महामारीच्या काळात मार्ग संघटनेने सामाजिक जाणिवेतून कोविड सेंटर उभारले व हजारो गरजू कामगारांना सर्वतोपरी मदत केली.याच कार्याची दखल घेत वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने(लंडन) या जागतिक स्तरावरील संस्थेने नोंद घेत मार्ग या संघटनेचे मार्गदर्शक स्वप्निल देशमुख यांना सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट हा पुरस्कार देऊन सन्मानित केले, हे आपल्या नगरकराच्या दृष्टीने मोठी अभिमानास्पद बाब असल्याचे पद्मश्रीश्री पोपटराव पवार यांनी प्रतिपादन केले.
याच कार्यक्रमामध्ये नगरमधील औदयोगिक क्षेत्रातील एक नामवंत कंपनी जी के एन सिंटर मेटल्स लिमिटेड यांनी देखील कोरोना महामारीच्या काळात कंपनीतील नियोजनबद्ध पद्धतीने वैद्यकीय सेवा सुविधा पुरविल्या तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना सातत्याने राबविल्या त्याचा परिणाम सर्वाची सुरक्षितता अबाधित राहून सकारात्मक परिणाम उत्पादन क्षमतेवर दिसला याची नोंद देखील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन यांनी घेऊन या कंपनीचे इंडिया ऑपेरेशन संचालक राजेश मिराणी व नगर युनिटचे संचालक पुरुषोत्तम ऋषी यांना देखील याच सर्टिफिकेट ने पद्मश्रीश्री पोपटराव पवार याच्या प्रमुख उपस्थितीत व वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डचे उपाध्यक्ष महेबूब सय्यद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
नगरमधील हॉटेल सुवर्णम प्राईड येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या प्रसंगी डब्लू बी आर चे सेक्रटरी दिब्यारंजन परीडा , कार्यकारी अधिकारी चंद्रकांत सावंत , वरिष्ठ अधिकारी सचिन ढेरे, विजय दळवी व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक जी के एन कंपनीचे एच आर हेड बाबासाहेब खिलारी यांनी केले, सूत्रसंचालन व स्वागत श्नायडर इलेक्ट्रिकचे चैतन्य खानवेलकर यांनी केले. पुरस्कारार्थींचा परिचय श्नायडर इलेक्ट्रिक चे एच आर हेड श्रीकांत गाडे, एक्साईड इंडस्ट्रीचे प्रमुख अरविंद कुलकर्णी व जी के एन सिंटरच्या एच आर मॅनेजर रुमा घोष यांनी केले.
सर्व पुरस्कारार्थींच्या वतीने स्वप्नील देशमुख बोलतांना म्हणाले,मी नगरला चार वर्षांपूर्वी आल्यानंतर येथील औद्योगिक क्षेत्रामध्ये सुरक्षितता व आरोग्य विषयक अधिक जनजागृती करावी वाटली यासाठी नगरच्या अनेक कारखान्यांची सकारात्मक अशी साथ मिळाली यातूनच मार्ग या सामाजिक संघटनेची उभारणी झाली व त्या माध्यमातुन सुरक्षा विषयक रॅली, विविध परिसंवाद, प्रथोमोपचार, वेगवेगळी प्रशिक्षने, सुरक्षा उपकरने त्याची हाताळणी प्रबोधने, स्थलांतरित कामगार व गरजूंसाठी अन्नदान , कोविड सेंटरची स्थापना असे अनेक उपक्रम सातत्याने राबविण्यात आले.यासाठी श्नायडर , इटन, हॉगोनस, जी.के.एन, एक्साईड , सी जी पावर , क्रॉम्टन , कमिन्स , आयएसएमटी , सनफार्मा , मिंडा , के.ए.स.पी.जी, आम इंडिया , कॅरिअर मायडिआ, क्लासिक व्हील, सिद्धीफोर्ज , बोथरा ऍग्रो, गल ग्रुप, सनफ्रेश ऍग्रो, संगमनेर तालुका दूध संघ, मळगंगा ग्रुप यांचे अतिशय मोलाचे सहकार्य लाभले त्यांचा मी ऋणी आहे.
पद्मश्री पवार यांनी मार्गच्या सर्व उपक्रमांचे भरभरून कौतुक केले सामाजिक जाणिवेतून आपणही समाजाचे काही देणे लागतो अश्या भावनेतून केलेले कार्य सर्वाना अनुकरणीय असे आहे, कोरोना महामारीच्या काळामध्ये पद्मश्री पवारांच्या जन्मगावी त्यांनी विविध उपक्रमांच्या, लसीकरणाच्या, प्रबोधनाच्या माध्यमातून केलेल्या कार्याची व हिवरेबाजार हे गाव राज्यामध्ये प्रथम कोरोनामुक्त केल्याची माहिती दिली. हिवरेबाजारमध्ये सर्व गावकऱ्यांना विश्वासात घेऊन शंभर टक्के क्षमतेने सर्वप्रथम शाळा सुरु केल्या अशी माहिती दिली.
हे सर्व सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी मार्ग ग्रुपचे सदस्य सचिन ठोसर , ज्ञानेश्वर डमाळे , चैतन्य खानवेलकर, सुभाष तोडकर, बाबासाहेब खिलारी, महेंद्र त्रिगुणे, संग्राम कदम यांची मोलाची साथ लाभली.जी के एन कंपनीच्या एच आर मॅनेजर रुमा घोष यांनी सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमास अहमदनगर जिल्ह्यातील विविध कंपन्यांचे वरिष्ठ आधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अहमदनगर जिल्ह्यात प्रथमच शासकीय व औदयोगिक कारखान्यातील अधिकाऱ्यांना अश्या सामाजिक कार्यासाठी वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन यांनी सन्मानित केले आहे या बद्दल सर्वत्र आनंद व समाधान व्यक्त होत आहे.