क्लेरा ब्रूस गर्ल्स हायस्कूलच्या मैदानात उभारण्यात येणारे फनफेअर (आनंद मेला) नॅशनल कंज्यूमर फेअर तात्काळ बंद करण्याची मागणी

- Advertisement -

क्लेरा ब्रूस गर्ल्स हायस्कूलच्या मैदानात उभारण्यात येणारे फनफेअर (आनंद मेला) नॅशनल कंज्यूमर फेअर तात्काळ बंद करण्याची मागणी

मराठी मिशनच्या मिळकतीबाबत तहसीलदारयाचे पुढील आदेश होईपर्यंत कोणताही फेरबदल करू नये अश्या आदेशाला केराची टोपली

स्वयंघोषित सचिव व अध्यक्ष यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी – द युनायटेड चर्च बोर्ड फॉर वर्ड मिनिस्ट्रीचे चेअरमन चंद्रकांत उजागरे

अहमदनगर (प्रतिनिधी) – अहमदनगर येथील क्लेरा ब्रूस गर्ल्स हायस्कूलच्या मैदाना संदर्भात मराठी मिशनचे मिळकतीबाबत तहसीलदार याचे पुढील आदेश होईपर्यंत कोणत्याही प्रकारे फेरबदल करू नये असा आदेश असताना सदर मिळकतीमध्ये फन फेअर साठी पत्र्याचे शेड बांधून तसेच अन्य प्रकारचा फेरबदल करून ते इतर व्यक्तींना भाड्याने दिल्यामुळे सदर व्यक्तींवर कायदेशीर कारवाई तसेच सदरचा फनफेअर आनंदमेळा नॅशनल कंज्यूमर फेअर तात्काळ बंद करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, अहमदनगर महानगर पालिका, तहसील कार्यालय व ग्रह शाखा येथे द युनायटेड चर्च बोर्ड फॉर वर्ल्ड मिनिस्ट्री संस्थेचे चेअरमन चंद्रकांत उजागरे यांनी निवेदन देऊन मागणी केली आहे.

पुढे निवेदनात म्हटले आहे की, द युनायटेड चर्च बोर्ड फॉर वर्ल्ड मिनिस्ट्री पी.टी.आर.नं.ई -९२२ मुंबई या संस्थेचा चेअरमन म्हणून अहमदनगर येथील क्लेरा ब्रूस गर्ल्स हायस्कूल मैदान संदर्भात मराठी मिशन यास नोंदणी क्र. एफ-२८७ व वायडर चर्च मिनिस्ट्रीज नोंदणी क्र. ई-९२२ या सार्वजनिक न्यासंबंधीत महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० च्या कलम २२ अन्वये अनेक प्रकरणे न्यायालयात व धर्मदाय आयुक्त मुंबई यांच्यासमोर प्रलंबित असून सदर अहमदनगर येथील क्लेरा ब्रूस गर्ल्स हायस्कूल मैदानाच्या ताब्यात तहसीलदार अहमदनगर यांनी आदेश करून अहमदनगर महानगरपालिका हद्दीत जुना सर्वे नंबर ३२१ त्याचा नवीन सर्वे नंबर ३५३ व जुना सर्वे नंबर ३२४ याचा नवीन सर्वे नंबर ३५६ अ. ३५६ ब. ३५६ क. याचा मिळून नवीन सर्वे नंबर ७४४३ या मिळकतीस स्टे(मनाई हुकूम) दिलेला असल्यामुळे सदर मिळकत कोणाही व्यक्तीस कोणत्याही कार्यक्रमास वापरण्यासाठी देऊ नये तसे केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असा ३० मार्च २०२४ रोजी अर्ज दिलेला होता.

सदर अर्जाच्या अनुषंगाने देवदान गोविंद भांबळ व विजया अर्जुन जाधव यांना तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार अहमदनगर यांनी मिळकतीमध्ये शेड बांधू नये तसेच वाढदिवसासाठी राजकीय सभा व बांबू व्यवसाय इत्यादीसाठी भाड्याने देऊ नये अगर कोणत्याही प्रकारे फेरबदल करू नये अशी ताकीद दिलेली आहे तसेच नगर भूमापन अधिकारी मंडळ अधिकारी तलाठी यांना सूचना देण्यात आलेले होते परंतु तरीदेखील स्वयंघोषित सचिव देवदान गोविंद भांबळ व स्वयंघोषित अध्यक्षा विजया जाधव यांनी जाणीवपूर्वक आपला आदेश जुगारून देऊन अवमान करून सदर मिळकतीमध्ये फनफेअर आनंद मेळा नॅशनल कंज्यूमर फेअर यासाठी भाड्याने देऊन त्यापासून फार मोठ्या प्रमाणात पैसे कमावत आहे. त्यामुळे वरील स्वयंघोषित सेक्रेटरी व अध्यक्षांवर तत्काळ कायदेशीर फौजदारी कारवाई करून मिळकतीचा पंचनामा करून आनंद मेळा नॅशनल कंज्यूमर फेअर बंद करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!