खडकीत दुर्धर आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांची मोफत तपासणी व औषधोपचार

खडकीत दुर्धर आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांची मोफत तपासणी व औषधोपचार

यशोदा लंके फाउंडेशन व होलीस्टिक क्लासिकल होमिओपॅथिक सेंटरचा उपक्रम

शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

अहमदनगर (प्रतिनिधी)- खडकी (ता. नगर) येथे दुर्धर आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांची मोफत तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले. यशोदा लंके फाउंडेशन व होलीस्टिक क्लासिकल होमिओपॅथिक क्लिनिक व रिसर्च सेंटरच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. या शिबिरास पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
या शिबिराचे उद्घाटन खडकी गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. सरपंच प्रवीण कोठुळे, उपसरपंच दगडू गायकवाड, पाणीपुरवठा सदस्य सचिन भिकाजी कोठुळे व  त्यांच्या  सहकाऱ्यांनी विशेष पुढाकार घेऊन या शिबिराचे आयोजन केले होते .
यशोदा लंके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रमोद लंके यांनी दुर्धर आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांची तपासणी करुन होमिओपॅथिक उपचार पध्दतीने दुर्धर आजार कायमचे संपणार असल्याचे स्पष्ट केले. तर या शिबिरात शंभरपेक्षा अधिक रुग्णांवर मोफत औषधोपचार करून त्यांना पुढील औषधोपचारासाठी ही योग्य मार्गदर्शन केले जाणार असल्याची त्यांनी माहिती दिली.
या शिबिराचा अनेक गरजू रुग्णांनी लाभ घेतला. शिबिराच्या यशस्वीतेसाठी महेंद्र शिंदे, दत्तात्रय कोठुळे, सुरेश उमाप आदींसह खडकी ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. यशोदा लंके फाउंडेशनचे कोषाध्यक्ष शिवाजी लंके, सचिव रक्षा लंके, सहसचिव रंजन इनमुलवार व सहकारी विकास अरुण, श्रद्धा जेटला यांनी औषध देणे व मार्गदर्शन करण्यास सहभाग नोंदवला.
- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles