खऱ्या अर्थाने युवकांवर समाजाची जबाबदारी आली आहे : आमदार संग्राम जगताप

0
94

पै जिशान शेख यांच्या वाढदिवसानिमित्त सावली सोसायटीला सामाजिक बांधिलकीतून आर्थिक मदत.

अहमदनगर प्रतिनिधी: सार्वजनिक जीवनामध्ये वावरत असताना प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जोपासत आपले कर्तव्य पार पाडावे.सण-उत्सव वाढदिवस साजरा करत असताना.सामाजिक बांधिलकी जोपासावी पै. जिशान शेख यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सावली सोसायटी संस्थेला आर्थिक मदत विशाल देऊन आपले कर्तव्य पार पाडले.

युवकांनी वाढदिवस साजरे करीत असताना वायफट खर्च न करता समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडावे.खऱ्या अर्थाने युवकांपुढे समाजाची जबाबदारी आली असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

पै जिशान शेख यांच्या वाढदिवसानिमित्त सावली सोसायटी संस्थेला आर्थिक मदतीचा धनादेश देताना आमदार संग्राम जगताप, उपमहापौर गणेश भोसले, माजी.स्थायी समिती सभापती सचिन जाधव,माजी स्थायी समिती सभापती मुदस्सर शेख, नगरसेवक कुमार वाकळे, नगरसेवक मनोज कोतकर, नगरसेवक स्वप्नील शिंदे, नगरसेवक निखिल वारे, मळू गाढळकर,निलेश भांगरे, विजय सुंबे,अमीत गाडे,गौस सय्यद,बंटी भिंगारदिवे,तमीम शेख,अजित कोतकर,मयूर राऊत,आकाश हुशारे,बाली बांगरे,राहुल सांगळे,पंकज मगर,भैया बोरुडे,मन्नान सय्यद,तौसिफ शेख आदी उपस्थित होते.

जिशान शेख म्हणाले की समाजामध्ये वावरत असताना युवकांचे संघटन करून समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडत आहे.समाजामध्ये अजूनही विविध प्रश्न प्रलंबित आहे.गरजवंताला पर्यंत युवकांच्या माध्यमातून मदत होणे गरजेचे आहे.या दृष्टिकोनातून आज आम्ही सावली सोसायटीला खारीचा वाटा म्हणून आर्थिक मदत केली आहे.यापुढील काळातही सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम नक्कीच करू असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here