खासदार डॉ. विखे पाटील मोहटादेवी चरणी नतमस्तक

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

पाथर्डी प्रतिनिधी : राज्यभर नवरात्री उत्सव साजरा होत असताना सातव्या माळेला खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील यांनी मोहटादेवीचे दर्शन घेतले. यावेळी विखे पाटील परिवाराच्यावतीने देवी मंदिराच्या परिसरात भाविकांसाठी 24 तास फराळ वाटप सुरू असलेल्या केंद्रावर भेट देऊन भाविकांना स्वतःच्या हाताने त्यांनी फराळाचे वाटप केले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भाणगे, अभय आव्हाड मा.नगराध्यक्ष, नंदुशेठ शेळके मा.नगरअध्यक्ष, बंदुशेठ उपनगराध्यक्ष, अजय रक्ताटे, पांडुरंग सोनटके, दत्ता सोनटके, संतोष वाघमारे, लालाभाई शेख, राजेंद्र नागरे, किशोर परदेशीराहुल तरोडे, तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते आणि दर्शनासाठी आलेले भाविक उपस्थीत होते.

खासदार डॉ. सुजय विखे यांनी दर्शन घेऊन वारी मार्गाने येत असताना शेकडो भाविकांसोबत संवाद साधत सेल्फी घेत नागरिकांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या.

राज्यभरातून हजारोच्या संख्येने भाविक येत असतात. येणाऱ्या भाविकांसाठी मंदिराच्या परिसरात खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून दसऱ्यापर्यंत 24 तास भाविकांसाठी उपवासाच्या खिचडीचे वाटप करण्यात येत आहे.

नवरात्रीच्या नऊ दिवसात राज्यभरातून हजारोच्या संख्येने भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. अशावेळी देवीचा प्रसाद भक्तांना मिळावा आणि येणाऱ्या भक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी खिचडीचे नियोजन करण्यात आले. पहिल्या दिवसापासून खिचडी वाटप सुरू झाली असून दिवसभरात शेकडो भाविकांनी प्रसादाचा आनंद घेत आहे. देवीच्या दर्शनासाठी तासंतास रांगेत उभे असणाऱ्या माता भगिनींना खिचडीचा प्रसाद मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.

खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील यांनी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या प्रत्येक भाविकाला खिचडीचा प्रसाद मिळाला पाहिजे अशा कार्यकर्त्यांना सूचना दिल्या असून जास्तीत जास्त भाविकांनी प्रसादाचा लाभ घेण्याची देखील विनंती केली आहे. याच बरोबर मंदिर व्यवस्थेकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल खासदार डॉ. विखे पाटील यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. तसेच खासदार डॉ.सुजयदादा विखे पाटील यांनी नवरात्र उत्सवाच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!