खासदार निलेश लंके प्रोफाईल

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

खासदार निलेश लंके प्रोफाईल

नाव – निलेश ज्ञानदेव लंके
जन्मतारीख – 10 मार्च 1980
पत्ता – मु पो- हंगा ता. पारनेर, जिल्हा- अहमदनगर
शैक्षणिक पात्रता

बी ए ,आयटीआय (फिटर ट्रेड)

भूषविले पदे

हंगा शिवसेना शाखा प्रमुख (2004)
हंगा ग्रामपंचायत सदस्य (2004)
सुपा गण प्रमुख (2005)
सुपा विभाग प्रमुख(2006)
शिवसेना उपतालुका प्रमुख पारनेर(2008)
ग्रामपंचायत सरपंच हंगा (2010)
पारनेर सेना तालुका प्रमुख(2013)

तालुका प्रमुख शिवसेना सोडली 2018

राष्ट्रवादीत प्रवेश जानेवारी (2019)
राष्ट्रवादीतून विधानसभा निवडणूक लढवली (2019)

एकूण मिळालेली मते – 139963
मताधिक्य – 59838
पराभूत(विजय औटी)उमेदवार- 80145

2024 लोकसभा निवडणूक महाविकास आघाडीकडून विजयी प्रस्थापित पन्नास वर्षापासून सत्ता विखे घराण्यांना
पराभूत केले

कोविड काळ

पहिला कोविड लॉकडाऊनमध्ये सुपा येथे दोन लाखाहून अधिक प्रवासी आणि विस्थापितांची सेवा.
कर्जुले येथे एक हजार घाटांची सेंटर त्यात 5 हजार रुग्ण बरे झाले.
दुसऱ्या कोविड लाटेत अकराशे बेडचे कोविड सेंटर व 100 ऑक्सिजन बेड असलेले देशातील पहिले मोठे कोविड सेंटर सुरू केले, 29 हजार रुग्णांवर उपचार केले. या कोविड सेंटरमध्ये एकही रुग्ण मयत झाले नाही.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून कोविड सेंटरची दखल घेण्यात आले.
केवळ पक्षातीलच नाही तर विरोधी पक्षातील अनेक आमदार आणि नेत्यांनी देखील कोविड सेंटरला भेट दिली.

कोविड सेंटर मध्ये स्वतः आमदार निलेश लंके हे राहत होते, रुग्णांचे मनोरंजन व्हावं यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा आयोजन केले जात होते.
कोविड सेंटरमध्ये रुग्णांवर नैसर्गिक उपचार केले जात होते.

सामाजिक कार्य

मतदारसंघांमध्ये विविध आरोग्य शिबिरे , रोजगार मेळावे कृषी प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रमांचा आयोजन, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा वाटप, महिलांसाठी मोहटादेवी यात्रेच दरवर्षे आयोजन , मुस्लिम महिलांसाठी खेड शिवापुर येथील दर्गा दर्शन, मुंबईतील महिलांसाठी एकविरा दर्शन, वीस वर्षांपासून युवकांसाठी वैष्णवी देवी दर्शन यात्रा, सामुदायिक विवाह सोहळ्याचा आयोजन, पोलीस भरतीसाठी व्हर्च्युअल अकादमी, खाकी अँप डिजिटल शाळेचा उपक्रम, स्व रोजगार साहित्याचे वाटप, स्वतःच्या पगारातून दर महिन्याला अपंगांसाठी सायकलचे वाटप.

पुरस्कार

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ इयर 2020
वर्ड बुक ऑफ लंडन 2021
महाराष्ट्र कोविड योद्धा 2021
द थेंम्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी पॅरिस फ्रान्स यांच्याकडून मानत डॉक्टर प्रधान(2024)
राज्यातील सामाजिक संघटनांकडून जवळपास शंभर पुरस्काराने सन्मानित

सदस्यत्व

अहमदनगर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य (2019)
महाराष्ट्र शासन कामगार आणि पर्यावरण समितीचे सदस्य (2019)

पैलवान नेते, लोकनेते, कोविड योद्धा , आदर्श लोकप्रतिनिधी, डॉक्टरेट अशा जनतेकडून मिळालेल्या उपाद्या

लिहलेल पुस्तक

मी अनुभवलेला कोविड(2024)

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!