अहमदनगर (प्रतिनिधी )-अहमदनगर जिल्ह्याचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी लोकसभेच्या विविध सत्रात सक्रिय सहभाग घेत उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल टॉपटेन खासदारात त्यांची नोंद झाली. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत अहमदनगर जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
१७ व्या लोकसभेतील ५४५ खासदारांपैकी २७० खासदार पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत. यापैकी १० खासदारांनी सभागृहाच्या कामकाजात सक्रिय सहभाग घेत उत्कृष्ठ कामगिरी केली. या १० मध्ये अहमदनगरचे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा देखील समावेश आहे.
विखे यांनी लोकसभेच्या 11सत्रांमध्ये, सात खासगी विधेयकांच्या चर्चेत सक्रिय सहभाग घेतला असून काही मुद्द्यांवर हस्तक्षेप करत जनते प्रति आपली भूमिका ठाम मांडली याबद्दल अहमदनगरच्या जेष्ठ पत्रकार, संपादक आणि जिल्हा प्रतिनिधी यांच्या वतीने खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचा सत्कार लोकमतचे निवासी संपादक सुधीर लंके, महाराष्ट्र टाइम्सचे विजयसिंह होलम,नगर सह्याद्रीचे संपादक शिवाजीराव शिर्के, पुण्यनगरीचे उपसंपादक राजेंद्र झोंड , विजय महाराज देशपांडे, झी न्यूजचे लैलेश बारगजे यांनी सत्कार केला.
याप्रसंगी इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे सुनील भोंगळ, कुणाल जयकर, प्रवीण सुर्वेसे, संतोष आवरी,सुनील थोरात,विक्रम बनकर,अभय ललवणी, एम.प्रसाद यांची प्रमुख उपस्थिती होती.
या सत्कारानंतर खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी उपस्थित पत्रकारांशी अहमदनगर जिल्ह्यातील विविध विकास कामा बाबत सविस्तर चर्चा केली.