खा.बजरंग सोनवणे व खा.निलेश लंके यांचा नगरसेवक गणेश कवडे यांच्यावतीने सत्कार
नगर – बीडचे खासदार बजरंग सोनवणे व खा. निलेश लंके यांचा नगरसेवक गणेश कवडे यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी परमेश्वर शेळके, विजय चितळे, अनिल कवडे, बाबासाहेब कवडे, ईश्वर शेळके, राजू म्हस्के, राहुल कवडे, राधेश्याम धूत, शिवा अनभुले, पै.ऋषी लांडे, ओंकार कवडे, अदित्य कवडे, दत्ता बोरुडे, देव कवडे आदि उपस्थित होते.
यावेळी खा.बजरंग सोनवणे म्हणाले, केंद्रातील भाजपा सरकारने जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने जनतेने त्यांना नाकारले. शेतकरी, कांदा, मराठा आरक्षण अशा अनेक प्रश्नांवर भाजप सरकार अपयशी ठरले. त्यातच महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी एकजुट दाखवत काम केल्याने नगर दक्षिण, बीड सह राज्यात महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. मिळालेल्या या संधीचा उपयोग जनेतेची कामे करण्यासाठी आम्ही करणार आहोत. खा.निलेश लंके हेही माझ्यासारखेच सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत. बीडचा नगरशी चांगला संबंध असल्याने एकत्रित काम करु.
यावेळी खा.निलेश लंके म्हणाले, गणेश कवडे यांनी नगरसेवक, सभापती म्हणून केेलेले काम काम कौतुकास्पद असेच आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी एकत्रित काम करु. जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक गणेश कवडे यांनी खा.निलेश लंके व खा.बजरंग सोनवणे यांचे जनसमान्यामध्ये असलेल्या कार्यामुळे जनतेने त्यांना दिल्लीला पाठविले आहे. काम करणारे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा लौकिक आहे. जनतेचा आवाज दिल्लीपर्यंत पोहचविण्याचे काम ते करतील असा विश्वास व्यक्त केला.
नगरसेवक गणेश कवडे यांच्या कार्यालयात खा.बजरंग सोनवणे व खा.निलेश लंके यांचे आगमन झाल्यानंतर फटाक्यांच्या अतिषबाजी व ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.