खा.मेधाताई कुलकर्णी यांच्या हस्ते श्री विशाल गणेशाची आरती

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

खा.मेधाताई कुलकर्णी यांच्या हस्ते श्री विशाल गणेशाची आरती

मंदिरातून प्रत्येकाला प्रेरणा मिळते – खा.मेधाताई कुलकर्णी

नगर – ग्रामदैवतावर तेथील भाविकांची मोठी श्रद्धा असते. त्यामुळे अशा देवस्थानांचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे. केंद्र व राज्यातील भाजपाप्रणित सरकारने देशातील मंदिरांच्या विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन देत देवस्थानांचा विकास साधला आहे. त्यामुळे भाविकांना अनेक सोयी-सुविधा मिळत आहेत. नुकतेच समस्त हिंदूंचे आस्था असलेले राम मंदिर पुर्ण झाले, याचा आपणा सर्वांचा अभिमान आहे. प्रत्येक मंदिरातून प्रत्येकाला प्रेरणा मिळत असते. नगरचे श्री विशाल गणेश मंदिरातील श्री गणेशाची मुर्ती नावाप्रमाणेच विशाल असून, दर्शनाने मोठे समाधान मिळाले आहे. मंदिराचा झालेला विकास, सुंदर नक्षीकाम व कलाकुसर देखणी असून, भक्तीमय वातावरणात मन प्रसन्न होत आहे, असे प्रतिपादन खा.मेधाताई कुलकर्णी यांनी केले.

शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात राज्यसभा खासदार मेधाताई कुलकर्णी यांनी भेट देऊन आरती केली. यावेळी देवस्थानच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर,  उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, भाजपचे दिलीप भालसिंग, बाबासाहेब सानप, पंडित वाघमारे, आदेश गायकवाड, सचिन पारखी आदि उपस्थित होते.

यावेळी अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर यांनी देवस्थानाच्यावतीने सुरु असलेल्या विविध उपक्रम व कार्याची माहिती दिली. पंडित खरपुडे यांनी आभार मानले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!