खूणाच्या प्रयत्नातील दोन महिन्यांपासून फरार असलेला आरोपी कर्जत पोलिसांकडून अटक

0
83

कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे

कर्जत पोलिस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ५१२/२०२१ भादवि कलम ३०७ मधील आरोपी लालासाहेब उर्फ बाळासाहेब हिरामण सुळ रा.वायसेवाडी तालुका कर्जत याने दिनांक ०७/०८/२०२१ रोजी फिर्यादी बाळासाहेब आजिनाथ सुळ रा.वायसेवाडी तालुका कर्जत हा त्याचे मोटरसायकलवर शेतात जात असताना आरोपीने त्याच्या अंगावर दुधाचा टॅंकर घालून फिर्यादीस जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला व तेथून पळून गेला.

या आरोपीचा शोध कर्जत पोलिस हे घेत असताना  गुप्त बातमीदारा मार्फत सदर गुन्ह्यातील आरोपी हा भिगवन येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने कर्जत पोलिसांनी त्यास भिगवण येथून ताब्यात घेऊन चौकशी केली असता.आरोपीने गुन्हा केल्याचे कबूल केले असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भगवान शिरसाट हे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाट,पोलीस अंमलदार देवा पळसे,यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here